

Pandhrpur, 18 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाणार, अशा केवळ माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहेत. परंतु आम्ही कदापि एनडीएसोबत जाणार नाही. आम्हाला त्याचं निमंत्रण नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठेने आहेत, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी 12 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी सुबुद्धी दिंडी काढली. या दिंडीत सहभागी होण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील हे पंढरपुरात आले होते, त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मी ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी घेतली होती, हे जाहीर आहे. आमच्या आमदारांचा ओढा महायुतीकडे नाही. त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी ते संपर्कात राहत असतील. आमदार राजू खरे शिवसैनिक होते, त्यामुळे त्यांचा अधिकचा संपर्क आहे. त्यांच्याविषयी मी अधिकचे काही बोलणे योग्य नाही.
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा करणे गरजेचे हेाते. अशा पद्धतीने त्यांना हटविणे योग्य नाही, असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
सरकार शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. जोपर्यंत हा महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा असाच सरकार विरोधात सुरू राहील, असा इशाराही पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.