Gopichand Padalkar Controversy, Tanaji Patil Appeal, Rajendra Deshmukh, Amarsinha Deshmukh Politics Saekarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना घरातच एकटं पाडण्याचा डाव : तानाजी पाटलांची 'देशमुख बंधूंना' जाहीर साद

Gopichand Padalkar : तानाजी पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर आरोप करत देशमुख बंधूंना सोबत येण्याचे आवाहन केले, आटपाडीत स्थानिक निवडणुकीत नवे समीकरण तयार होताना दिसत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Atpadi Politics : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना त्यांच्याच तालुक्यात एकटं पाडण्याची व्यूहरचना शिवसेनेचे स्थानिक नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी आखली आहे. गोपीचंद पडळकर यांनी 'अण्णा बापूं' वर एकेरी शब्दात खालच्या पातळीवर टीका करून शिव्याची लाखोली वाहिली. राजकारणाचा दर्जा ढासळलेल्या विकृत विचारसरणीला गाडण्यासाठी माजी आमदार राजेंद्र देशमुख (अण्णा), अमरसिंह देशमुख (बापू) यांनी आमच्यासोबत यावे, असे जाहीर आवाहन तानाजी पाटील यांनी केले आहे.

आटपाडी येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेदरम्यान, देशमुख गटाचे बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ नागणे, श्री संत सावता माळी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप माळी, बाळासाहेब देशमुख यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी सभापती काकासाहेब पाटील, शशिकांत राऊत, रावसाहेब सागर, डॉ. विनय पत्की, शहाजी जाधव, दत्तात्रय पाटील, राजेंद्र खरात, मनोज नांगरे आदी उपस्थित होते.

पाटील यांनी ३ वर्षांत नगरपंचायत क्षेत्रात केलेल्या कामाचा आढावा मांडला. ते म्हणाले, "३० वर्षांच्या राजकारणात कधीही विरोधकावर एकेरी शब्दात टीका केली नाही. सर्व जाती व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. अलीकडे विकृत बुद्धीच्या नेतृत्वाने राजकारण रसातळाला नेले आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे (ZP Election) माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यावर एकेरी शब्दात खालच्या पातळीवर टीका केली. एवढेच नव्हे तर शिव्या दिल्या. त्या तुमच्याच कार्यकर्त्यांच्या

नव्हे तर आमच्याही जिव्हारी लागल्या.

तरीही अमरसिंह देशमुख त्यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्यासोबत गेले. जाती जातीत, समाजात विष पेरून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. तो हाणून पाडण्याची आमची व देशमुख कुटुंबीयांची जबाबदारी आहे.

त्यासाठी सोबत या. तुमच्यासाठी दोन खुर्च्या सन्मानासाठी ठेवल्या आहेत, असेही आवाहन त्यांनी केले. सध्या राजेंद्र देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आहेत. तर अमरसिंह देशमुख भाजपमध्ये आहेत. मध्यंतरी अमरसिंह देशमुख आणि पडळकर यांच्यातील विसंवादामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT