Sangli News, 18 Oct : आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगली डीसीसी बँकेतील उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने बाद केला होता. हा पडळकरांसाठी मोठा धक्का होता. या निर्यणाच्या विरोधात त्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पडळकरांचा अर्ज वैध ठरवला.
याच सर्व घडामोडीनंतर सांगलीचे पालकमंत्री तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांचे अभिनंदन करत त्यांना चॉकलेट दिले आहे. यावेळी, मिश्कील टिपण्णी करताना, आता बोला कमी आणि काम जास्त करुन दाखवा, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
सांगली डीसीसी बँक निवडणुकीतील जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठानेही तो निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे, आमदार पडळकरांची जिल्हा बँक निवडणुकीतून बाहेर गेल्याची चर्चा रंगली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून पडळकर यांना दिलासा मिळाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांची एन्ट्री झाल्याने निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कॅडबरी देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच, पडळकर यांच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा घाबरतात अशी स्थिती असल्याचे मिश्कीलपणे त्यांनी म्हटले.
तर ते बँकेत येतील याबाबत सगळी व्यूव्हरचना झाली आहे. कसलेला पैलवान जसा आठ ते दहा जणांना लोळवतो तसे ते आहेत. परंतु, "गोपीचंद पडळकर तू बोल कमी आणि काम जास्त कर, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उन्माद नको,उत्साह हवा", अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना कानपिचक्या दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.