Mumbai News, 18 Oct : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या वन विभागात आगामी तीन वर्षांत तब्बल २५ ते ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. भाजप नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षांत २५ ते ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती
महाराष्ट्राच्या वन विभागाच्या कामकाजात मोठे बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने नियोजन सुरू केले आहे. वन विभागाचे मनुष्यबळ वाढवणे आणि विभागाची कार्यक्षमता सुधारण्यावर सरकारचा भर असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
याबाबत बोलताना गणेश नाईक म्हणाले, "वन खात्यामध्ये आगामी काळात ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून, आगामी तीन वर्षांच्या कालावधीत वन खात्यात साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकांची नवीन भरती केली जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या भरतीमुळे वन विभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडण्यास मदत होईल."
सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी मोठी संधी
वन विभागातील या संभाव्य भरतीमुळे राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे, तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
मात्र, या भरतीअंतर्गत वनरक्षक, वनपाल किंवा इतर कोणत्या संवर्गातील किती पदे भरली जाणार, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि भरतीचे वेळापत्रक याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना वन विभागाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.