Durga Puja Stampede : दुर्गापूजेच्या उत्सवात मोठी दुर्घटना! भीषण चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू

Kolkata Durga Puja Stampede : कोलकाता शहरातील प्रसिद्ध चोरबगान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात शनिवारी घडलेल्या या घटनेत आतापर्यंत तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. दुर्गापूजा मंडपातील प्रचंड गर्दी या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Kolkata Durga Puja Stampede | 19 Dead
Kolkata Durga Puja Stampede | 19 DeadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolkata Durga Puja Stampede : राज्यासह देशभरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत असतानाच पश्चिम बंगालमधून एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलकात्यात दुर्गापूजेच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

शहरातील प्रसिद्ध चोरबगान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात शनिवारी घडलेल्या या घटनेत आतापर्यंत तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. दुर्गापूजा मंडपातील प्रचंड गर्दी या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मंडपातील दर्शन बंद केले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

Kolkata Durga Puja Stampede | 19 Dead
Gokul Election News: 'गोकुळ'च्या आखाड्यातून खळबळजनक अपडेट; मतमोजणी प्रक्रिया दोनवेळा बदलली, दिग्गजांची धडधड वाढली

दरम्यान, दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी भाविकांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिकेतून कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kolkata Durga Puja Stampede | 19 Dead
Forest Recruitment : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

विशेष म्हणजे, यंदा चोरबगान सार्वजनिक दुर्गापूजा मंडळाने आकर्षक आणि वेगळी संकल्पना राबवली होती. या सजावटीची चर्चा असल्याने शनिवारी मंडप पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यातून ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com