पश्चिम महाराष्ट्र

BJP Leader Arrest : भाजपच्या विद्यमान उपसभापतीला जमिनीच्या बनावट दस्ताऐवजप्रकरणी अटक; साताऱ्यात खळबळ

Jawali Panchayat Samiti News : जमिनीसंदर्भातील कथित बनावट दस्तऐवज फसवणूक प्रकरणात जावळी पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांना न्यायालयाच्या आदेशानंतर अटक करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 21 July : जमिनीसंदर्भात बनावट दस्ताऐवज करून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जावळी पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान उपसभापती गोरख महाडिक यांना अटक करण्यात आली आहे. खटल्याच्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिलेले महाडिकांच्या विरोधात अटकपूर्व वॉरंट निघालं होतं. ते रद्द करण्यासाठी आलेले असताना त्यांच्यासह सात जणांना अटक करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.

अटकेनंतर उपसभापती महाडिक यांच्यासह सात जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. भाजपच्या विद्यमान उपसभापतीला अटक झाल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सन 2013 मध्ये जमिनीचा बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून विद्यमान उपसभापती गोरख महाडिक, विकास देशमुख, संदीप क्षीरसागर, सचिन बेलोशे व इतर दोघांसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. मात्र, या न्यायालयीन प्रक्रियेत हे सर्व सातही जण वारंवार गैरहजर राहिले.

न्यायालयीन प्रक्रियेत वारंवार गैरहजर राहणाऱ्या या सर्वांच्‍या विरोधात मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार उपसभापती गोरख महाडिक, संदीप क्षीरसागर आणि सचिन बेलोशे हे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात आले होते.

त्या वेळी मेढ्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी तातडीने या तिघांना अटक करून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यामुळे जावळीत मोठी खळबळ उडाली आहे.

गोरख महाडिक हे जावली पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती असून ते भाजपच्या तिकिटावर नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. खुद्द विद्यमान उपसभापतींना अटक झाल्याने जावली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT