Solapur Math Threat : दोन पानांची चिठ्ठी टाकून मठ उडवून देण्याची धमकी : चिठ्ठी टाकताना महिला सीसीटीव्हीत कैद

Woman threat to Math : सोलापूरच्या कस्तुरबा नगरातील श्री सदगुरू बसवरारुढ मठात एका महिलेने धमकीची चिठ्ठी टाकल्याची घटना घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Solapur Crime
Solapur CrimeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 July : सोलापूर शहराच्या कस्तुरबा नगरातील श्री सदगुरू बसवरारुढ मठात एका महिलेने दोन पानांची चिठ्ठी टाकून त्याद्वारे मठ उडवून देण्याची धमकी दिली आहे. मठात चिठ्ठी टाकताना संबंधित महिला ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संबंधित महिलेने काही राजकीय पुढाऱ्यांसह मुस्लिम समाजातील अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिला सोमवारी (ता. २० जुलै) पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहरूनिस्सा लाडलेसाब शेख असे त्या महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ती महिला रविवारी (ता. १९ जुलै) सायंकाळी मठाजवळ गेली होती. त्याठिकाणी कोणी नसल्याची संधी साधून तिने जवळची दोन पानांची चिठ्ठी मठात फेकली आणि ती त्या ठिकाणाहून निघून गेली. सुमारे ५७ वर्षीय ती महिला घरात एकटीच राहायला आहे.

मानसिक विकृतीतून तिने ही कृती केल्याचे मानले जात आहे. तिला समाजातील लोक दुश्मन वाटतात, अशा स्वरुपाची चिठ्ठी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मठातील लोकांच्या हाती चिठ्ठी पडली आणि त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला.

Solapur Crime
CJP Protest : त्यांना सोनम वांगचूक यांना शहीद करायचं होतं, त्यातून देशात...: सदाभाऊ खोतांचा खळबळजनक दावा

पोलिसांनी मठाला भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ती संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने चिठ्ठी टाकल्याची कबुली दिली आहे.

Solapur Crime
Satara Dcc Bank : एका मताने झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शशिकांत शिंदेंनी पुन्हा ठोकला शड्डू; शिवेंद्रराजे गटातील बेबनाव पथ्यावर पडणार

पोलिसांनी तिला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. तिला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. चिठ्ठीतील मजकुराच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी केली होती. फौजदार महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com