<div class="paragraphs"><p>Bhagatsingh Koshyari - CM Uddhav Thackeray&nbsp;</p><p>Governor vs Government</p></div>

Bhagatsingh Koshyari - CM Uddhav Thackeray 

Governor vs Government

 
Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यपालांनी निर्णय अडवला : महाविकास आघाडी बंडखोरीच्या तयारीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : १२ आमदारांच्या नावाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी अजूनही मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष सातत्याने पहायला मिळतो. पण आता राज्यपालांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या अजून एका प्रस्तावाला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्टपणे बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता आणखी एका मुद्द्यावरुन राज्यपाल विरुद्ध सरकार ((Governor vs Government) असा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेत सध्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Assembly President Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी अर्ज भरायचे आहेत. मात्र सध्या राज्यपालांनी अजूनही ग्रीन सिग्नल दिलेला नसल्याने हा केवळ निवडणूक कार्यक्रम कागदोपत्री राहणार का? असा सवाल विचारला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने २३ डिसेंबर रोजी राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळविले आहे, पण त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतरच सभागृहाच्या दैनंदिन कामकाजात या निवडणूक कार्यक्रमाचा समावेश होणार आहे.

राज्यपालांनी हा निर्णय अडवल्यानंतर या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्टपणे बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबात स्पष्ट करताना म्हटले की, दिल्लीवरून अध्यक्षपदाचे नाव अद्याप अंतिम झालेले नाही. राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळवले आहे, पण त्यांच्याकडून अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. पण त्यांनी मंजूरी दिली नाही तरी निवडणूक होणार आहे. त्यांना केवळ कळवायचे होते, तर त्याबाबतचे पत्र मंत्रिमंडळाने माहितीस्तव पाठवले आहे. सोमवारी ही निवडणूक होणार आहे. हायकमांड यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत नाव जाहीर होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांनी जोडले हात...

अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. मात्र यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांची नाव सध्या आघाडीवर आहे. आज पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना तुमचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हात जोडले. त्यामुळे अद्यापही विधानसभा अध्यक्षपदासाठी नेमके कोण याबाबत सस्पेन्स कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT