Santosh Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्त राज्यातील ग्रामपंचायतचे कामकाज बंद मात्र 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु

Santosh Deshmukh Case: देशमुख यांच्या मारेकरांना अटक करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवून सरपंच संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे

Rahul Gadkar

Kolhapur News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मात्र, या प्रकरणावरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मागील 22 दिवसांपासून देशमुख यांचे मारेकऱ्यांना अटक झाली नसल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे.

देशमुख यांच्या मारेकरांना अटक करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवून सरपंच संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. राज्यभरात अनेक ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलने केली जात असताना कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि सरपंच संघटना यांनी आंदोलनात भाग घेतलेला नाही.

सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटनांच्या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापुरातील संघटना सहभागी होणार नाहीत. राज्यात सरपंचांच्या वेगवेगळ्या तीन संघटना आहेत. आजच्या आंदोलनामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा सहभाग नाही. मात्र नऊ तारखेला  या तीन जिल्ह्यातील संघटनेने पुकारला बंद पुकारलेला आहे. याबाबतची माहिती पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान 9 जानेवारी रोजी कोल्हापूर ,सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तीबाबत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या पद्धतीने मदत करून संतोष देशमुख यांना मदत करण्याचे आवाहन  या संघटनेने केले आहे. 

तसेच संतोष देशमुख यांच्या घटनेसारखे ना पुन्हा या राज्यात घडू नये, त्यामुळे त्या गुन्हेगाराला कडक शासन व्हावे, सरपंच संरक्षण कायदा मंजूर व्हावा, तसेच सरपंच उपसरपंच यांना पेन्शन लागू करावी अशी मागणी ही यावेळी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT