Mangalvedha  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha : ...म्हणून मंगळवेढ्यात निर्माण झाली मुंबईच्या राजकारणासारखी परिस्थिती!

Mangalvedha Gram Panchayat Election : मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.

Mayur Ratnaparkhe

Mangalvedha Politics : मुंबईत ज्या प्रमाणे कोणता आमदार कोणत्या पक्षात आणि कोणत्या नेत्याच्या गटात सामील आहे, हे सामान्य माणसाला लवकर कळत नाहीत, अगदी तशीच अवस्था मंगळवेढा तालुक्यातही निर्माण झाली असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सरपंच आणि नूतन सदस्य रोज एका नेत्याच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारत आहेत आणि त्यामुळे हे नेतेही निवडून आलेले सरपंच आमच्याच गटाचा असा दावा करीत आहेत.

त्यामुळे एकूणच २७ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असतील तरी सर्वपक्षीय नेत्यांनी विजयाचे दावे केल्याने निडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या ५० हुन अधिक होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नुकत्याच मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि नूतन सदस्यांनी तालुक्यातील आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील आणि बी आर एसचे नेते भगीरथ भालके यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारले आणि आम्ही तुमच्याच विचाराचे असे शब्दही दिले. त्यामुळे आपल्याच गटाने सर्वाधिक सरपंच आणि ग्रामपंचायती निवडून आल्याचे दावे स्थानिक राजकीय नेत्यांनी केले आहेत.

आमदार अवताडे गटाने १४ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे, तर भालके गटानेही १३ ग्रामपंचायतीत विजयाचा दावा केलेला आहे. अभिजित पाटील गटाने ९ गावात आपल्या विचाराचे सरपंच आणि सदस्य असल्याचे प्रतिदावे केले आहेत. तर आमदार प्रशांत परिचारक समर्थक समविचारी आघाडीनेही आपले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची अवस्था मुंबईतील पक्षीय राजकारणासारखी संदिग्ध झालेली आहे. कोणत्या गावात कोणत्या गटाचा सरपंच आणि आणि ग्रामपंचायतीत सत्ता कुणाची आली, हे प्रत्यक्षात निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांनाही कळेना झालेले आहे.

तर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची सरशी झाली आणि कुणाची हार झाली याचा ताळमेळ अजूनही तालुक्यातील जनतेला लागलेला नाही. एकंदरीत मुंबईतील राजकारणाचे पडसाद मंगळवेढ्याच्या राजकारणातही उमटल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT