ED Summons To Pednekar : किशोरी पेडणेकरांना ईडीने पुन्हा पाठविले समन्स; २३ नोव्हेंबरला चौकशीला बोलावले

Mumbai Shivsena Leader News : मुंबई महापालिकेने कोरोना काळात महापालिका रुग्णालयांसाठी बॉडी बॅग खरेदीत १८०० रुपयांची एक बॅग ही ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे.
 Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले आहे. त्यात त्यांना येत्या २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता त्या ईडीच्या चौकशीला सामोरे जातात की नाही, हे पाहावे लागणार आहे. (ED sent summons to Kishori Pednekar again)

कोरोना काळातील रुग्णांच्या बॉडी बॅग गैरव्यवहार प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले होते. मुंबई महापालिकेने कोरोना काळात महापालिका रुग्णालयांसाठी बॉडी बॅग खरेदीत १८०० रुपयांची एक बॅग ही ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. त्या वेळी महापौर असलेल्या पेडणेकर यांच्या सूचनेनुसार ही खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Kishori Pednekar
Sharad Pawar Certificate : पवारांच्या मदतीला संभाजी ब्रिगेड; सोशल मीडियातून फिरणाऱ्या ओबीसी दाखल्याचा केला पर्दाफाश

दरम्यान, ईडीने पेडणेकर यांना यापूर्वीही समन्स बजावले होते. त्यावेळी ही पेडणेकर ह्या ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्या नव्हत्या. कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्यांनी ईडीकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यानंतर ईडीने त्यांना २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून समन्स जारी केले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर चौकशीसाठी ईडीसमोर हजर होतात की नाही, हे पाहावे लागणार आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच मृतदेहाच्या बॅग खरेदीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महापालिकेचे आयुक्त रमाकांत बिरादार यांची मागील महिन्यातच चौकशी केली आहे. त्या खरेदी व्यव्हाराच्या काळात बिरादार हे त्या विभागाचे प्रमुख होते. खरेदीतील अनियमतेबाबत त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पेडणेकर यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 Kishori Pednekar
Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचे मोठे विधान; ‘जनतेला अन्‌ कायद्याला अपेक्षित निर्णय देणार’

गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर या ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. पण, मुंबई पोलिसांच्या चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. चौकशीला पेडणेकर हजरही झाल्या होत्या. मात्र, ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठविले आहे.

 Kishori Pednekar
One Crore Bribery Case : एक कोटी लाच प्रकरण; ‘वाघ’च्या शोधासाठी ‘लाचलुचपत’चे पथक ऐन दिवाळीत ‘ऑन ड्यूटी’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com