Chandrakant Patil On Home Ministery sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : अखेर सदस्य निवडीला मुहूर्त लागलाच! दादांनी केली सदस्यांची नावे निश्चित; भाजपसह मित्र पक्षांची धाकधूक वाढली

Sangli Niyojan Samiti Politics : राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. अनेक जिल्ह्यात अद्याप जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीला मुहूर्त लागलेला नाही. पण सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नावे निश्चित केली आहेत.

Aslam Shanedivan

Sangli News : राज्यात महायुतीचे सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. पण अनेक ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडी झालेल्या नाहीत. तसेच सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीही रखडल्या होत्या. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात हात घालत नावे निश्चित केली आहे. ही नावे देखील त्यांनी मंत्रालयाकडे पाठवल्याने जिल्ह्यात भाजपसह मित्र पक्षात धाकधूक वाढली आहे.

सहा महिन्यांनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीला मुहूर्त लागला असून चंद्रकातदादा यांनी हा विषय मार्गी लावला आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, जनसुराज्य, रयत क्रांती, आठवलेंची आरपीआय अशा पक्ष आणि संघटनांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीवर सदस्य निवड करताना त्यात समतोल राखत त्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित केली आहेत.

पण महायुतीतील तीन पक्ष आणि इतर संघटना यांचा समतोल ते कसा राखला याचीच चर्चा आता जिल्ह्यासह राज्यात सुरू झाली आहे. तर अशा गोंधळात देखील चंद्रकातदादांनी त्यावर कसा मार्ग काढला , हे ही नावे समोर आल्यानंतर कळणार आहे.

दरम्यान येत्या दोन दिवसांत त्या नावांना मान्यता मिळण्याची शक्यता असून, त्यात कोणाचा नंबर लागतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळेल, याकडे अधिक लक्ष आहे. भाजपकडून नवे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, संग्रामसिंह देशमुख, दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे नाव निश्चित मानले जात आहेत.

तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळ यांच्या नावाची चर्चा होती. पण शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप नाव समोर आलेले नाही. मात्र जनसुराज्य पक्षाकडून समीत कदम यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

रयत क्रांतीकडून आमदार सदाभाऊ खोत यांचे नाव पुढे सुचवण्यात आले आहे. तर आरपीआयला किमान जिल्हा नियोजन समितीत तरी संधी मिळणार का? याकडे जगन्नाथ ठोकळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT