Guardian Minister Prakash Abitkar’s absence from a Kolhapur CPR Hospital advertisement fuels political speculation within Mahayuti. sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : पालकमंत्र्यांचा फोटो गायब, सीपीआर प्रशासनाला आरोग्य मंत्र्यांचं वावडं?

CPR Hospital Prakash Abitkar : कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयातील विविध कामांचा शुभारंभ आज होत आहे. मात्र, या संदरभात दिलेल्या जाहिरातूमधीन पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचा फोटो गायब असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत धुसफूस या ना त्या कारणाने सुरूच आहे. प्रत्येक राजकीय पक्षात चढाओढ दिसून येत असली तरी महायुती म्हणून आपण एकसंघ असल्याचे राजकीय नेत्यांकडून दाखवले जात आहे. असे असताना कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणजेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) प्रशासनाला आरोग्यमंत्र्यांचाच विसर पडला की काय? असा सवाल एका जाहिरातीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एकीकडे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही, असा विरोधकांकडून आरोप होत असताना सीपीआर प्रशासनाने दिलेल्या जाहिरातीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचाच फोटो नसल्याने विरोधकांच्या आरोपांना खतपाणी मिळत आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा कायापालट होत आहे. जिल्ह्याला वैद्यकीय हब बनवण्यासाठी एकीकडे मंत्री मुश्रीफ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे मंत्रीपद आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात कोल्हापूर क्रांती करत असताना आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचाच सीपीआर प्रशासनाला विसर पडला आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सीपीआर मधील विविध विकास कामांसाठी 250 कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात होत आहे. त्याचा आज शुभारंभ आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत. तर प्रमुख उपस्थिती कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम या आहेत. यांचा फोटो निमंत्रण पत्रिकेवर आहे.

प्रमुख सन्माननीय उपस्थितीमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांची उपस्थिती असणार आहे. यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार आमदारांची नावे जाहिरातीमध्ये आहेत.आरोग्य मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे प्रकाश आबिटकर आहेत. पालकमंत्री म्हणून आबिटकर यांचा फोटो असणे आवश्यक आहे. मात्र त्यांचाच फोटो का टाळला असावा? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान आज आरोग्य मंत्री आबिटकर हे उशिरा कोल्हापुरात येणार आहेत. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राजकारण की प्रशासनाला विसर?

सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पालकमंत्र्यांचा फोटो नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. पालकमंत्री पदावरून झालेली स्पर्धा आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद हे देखील कारणीभूत आहे का? की खरंच सीपीआर प्रशासनाला विसर पडला. अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या वादात पालकमंत्र्यांचा विसर?

सध्या कोल्हापुरात जिल्हा शल्य चिकित्सक आणि सीपीआर महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यात केबिन वरून वाद सुरू आहे. शल्यचिकिस्तक इथे आरोग्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतात. तर अधिष्ठाता हे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारित येतात. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांच्यातील वाद हा मंत्र्यांपर्यंत पोहोचला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT