Shambhuraj Desai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : 'हॅलोऽऽ...मी शंभूराज देसाई बोलतोय...': कलेक्टरला आलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला अन्‌ अनेक दिवसांचे पेडिंग काम मार्गी लागले! (video)

Satara Political News : शंभूराज देसाई यांनी या फोन कॉलच्या दरम्यान आपल्या स्वीय सहाय्यकांना झापले. गट नंबर आणि गावाचे नाव लिहून घेण्याची सूचना करताना पीएला कडक सूचना केली.

Vijaykumar Dudhale

Satara, 07 August : राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे आज (ता. 07 ऑगस्ट) सातारा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना लॅंडलाईन फोन खणखणला. तो थेट मंत्री शंभूराज देसाई यांनी उचचला आणि अनेक दिवसांपासून पेडिंग असणारे कराड तालुक्यातील मलकापूर येथील वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर थेट कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन लावत संबंधित वकिलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यातून शंभूराज देसाई यांची कार्यतत्परताही दिसून आली.

पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील फोन खणखणला. तो वाजणारा फोन नेमका पालकमंत्री देसाई यांनी उचला. कोण बोलतंय, असं पालकमंत्री विचारत असतानाच समोरील व्यक्तीने कराडमधून बोलत असल्याचे सांगितले. देसाई यांनी संबंधित व्यक्तीला तुम्हाला काय पाहिजे, अशी विचारणा केली

समोरून बोलणाऱ्या व्यक्तीला नेमकं कोणाशी बोलायचं आहे, हे सांगता येत नव्हते. त्यामुळे पालकमंत्री त्यांना जिल्हा अधीक्षक...भूमिअभिलेख.... तलाठी (Talati).....तलाठी अध्यक्ष ऑफीस होय, असं विचारत होते. तलाठी अध्यक्ष म्हणजे तलाठी संघटना हो. ती तलाठ्यांची खासगी संघटना आहे, म्हणजे त्यांची वेगळी संघटना आहे. तुमचं कलेक्टरांकडे काय काम आहे, सांगा, अशी विचारणा शंभूराज देसाई यांनी संबंधित व्यक्तीकडे केली.

फोनवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ७/१२ दुरुस्तीचे काम असल्याचे सांगितले. त्यानुसार शंभूराज देसाई यांनी तुमचा ७/१२ दुरुस्तीची काम करायचं आहे होय, अशी विचारणा केली. आपल्या स्वीय सहायकांडे लिहिण्याची खून करत ‘पीए हात घालना खिशात, पेन काढ ना’ असे आदेश सोडले. कुठल्या गावचा ७/१२ दुरुस्त करायचा आहे. तेव्हा त्यांनी कराड तालुक्यातील मलकापूरचा करायचा आहे, असे सांगितले.

सर्व्हे/गट नंबर काय आहे. संबंधित व्यक्तीने गट नंबर सांगितला. मलकापूरचा तलाठी तुम्हाला दुरुस्त करून देत नाही का, अशी विचारणा केली. समोरच्या व्यक्तीने तो माहितीच देत नसल्याचे सांगितले. तुम्हा कऱ्हाडच्या प्रांताधिकाऱ्यांना भेटलात का, अशी विचारणा केली. समोरच्या व्यक्तीने तहसीलदाराला भेट असल्याचे सांगितले. तेव्हा तुमचं नाव सांगा, अशी विचारणा शंभूराज देसाई यांनी केली. तेव्हा समोरील व्यक्तीने आपण ॲड. एस. पी. शहा बोलत असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी तुम्ही ॲडव्होकेट आहात, असे आश्चार्याने विचारले.

समोरच्या व्यक्तीने जेव्हा आपण ॲड. एस. पी. शहा बोलत असल्याचे सांगितले, तेव्हा ‘मी शंभूराज देसाई बोलतोय, पालकमंत्री’ अशी आपली ओळख सांगितली. मी कलेक्टरच्या चेंबरमध्ये बसलोय आणि तुमचा मी डायरेक्ट उचलला. तुमचं काम करतो मी, कऱ्हाडच्या प्रांताधिकाऱ्यांना बोलतो मी, असे ॲड शहा यांना सांगितले. देसाई तेवढ्यावरच थांबले नाही तर बघा पालकमंत्री किती तत्पर आहे, डायरेक्ट फोन उचलतात की नाही. धन्यवाद म्हणत त्यांनी फोन ठेवत असतानाच पीएला कराडच्या प्रांतांना फोन लावण्यास सांगितले.

मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने कराडच्या प्रांतांना फोन लावत ॲड शहा यांचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्या मॅटरमध्ये काय वाद आहे का, अशीही विचारणा त्यांनी प्रांतांना केली. तेवढा काम मार्गी लावा, बघा तेवढं, अशी सूचना त्यांनी कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT