Independence Day 2023 : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 76 व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणी ध्वजवंदन करायचे यावरुन सध्या शिंदे, फडणवीस, पवार यांच्या सरकारमध्ये कलगीतूरा रंगला आहे. यातच सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्याकडे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते साताऱ्यात Satara ध्वजवंदन करणार की ठाणे येथे याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या.
राष्ट्रवादीकडून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साताऱ्यात ध्वजवंदन होणारअशी ही चर्चा होती. पण, पालकमंत्री देसाई हेच स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकार कार्यालयातील मुख्य ध्वजवंदनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजवंदन करणार आहेत. त्यामुळे सर्व चर्चा फोल ठरल्या आहेत.
मुख्य शासकीय समारंभात नागरीकांनी सहभाग घ्यावा यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ ते ९.३५ या दरम्यान ध्वजवंदनाचा व इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय कार्यक्रम घेऊ नये.
तथापि इतर शासकीय कार्यालयात अथवा संस्थेचा त्या दिवशी ध्वजवंदनाचा कार्यक्रम करावयाचा असेल तर तो सकाळी ८.३५ च्या पुर्वी किंवा ९.३५ च्या नंतर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.