Karad News : भाजपला (BJP) स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडतात. भाजपमध्ये आमदारांचे संख्याबळ बघितलं तर निम्मी माणसं काँग्रेसचीच (Congress) आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्यावर अन्याय झालाय असे म्हटले आहे. त्याची हायकमांड सखोल चौकशी करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
श्री. चव्हाण म्हणाले, नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होणार आहे. ती गोष्ट गंभीर आहे. त्याची चौकशी वरिष्ठांकडून होत आहे. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत बैठक आहे. त्यात सविस्तर चर्चा होईल.
नेते बाळासाहेब थोरात यांनी अन्याय झाला असे म्हटले असेल तर हायकमांड या प्रकरणाची चौकशी करेल. भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात. भाजपमध्ये आमदारांच्या संख्याबळ बघितलं तर निम्मी माणसे काँग्रेसचेच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.