AAP sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : 100 कोटींच्या रस्त्यांची कामे अर्धवट, हसन मुश्रीफांचा दावा फसवा; 'आप'चा आरोप

Hasan Mushrif AAP : 16 पैकी पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा महापालिका करत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील याचा पुनरुच्चार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठीकीत केला.

Roshan More

AAP News : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाभियान अंतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांसाठी तब्बल 100 कोटींचा निधी उपलब्ध झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या कामाचा आरंभ झाला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या कामाचे वर्क ऑर्डर संबंधित कंपनीला देण्यात आली. मात्र, काम सुरू होण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला. तसेच झालेले काम देखील अर्धवट असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

16 पैकी पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा महापालिका करत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील याचा पुनरूच्चार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठीकीत केला. परंतु यातील एकही रस्ता एस्टीमेट प्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.

वास्तविक पाहता एस्टीमेट व रोड क्रॉस सेक्शन डिझाईन प्रमाणे रस्ते झाले पाहिजेत. राजारामपुरी माऊली चौक ते गोखले कॉलेज या रस्त्यासाठी 7,72,20,087 इतके एस्टीमेट करण्यात आले. यामध्ये रस्त्यावरील बीसी (बिटूमिनस काँक्रेट) 30 मिमी चा लेयर टाकलेला नाही, तसेच वेट मिक्स मॅकेडम (डब्लूएमएम), डाव्या बाजूस आरसीसी पडदी चॅनेल, उजव्या बाजूस सिमेंट काँक्रेट पाईप टाकणे अशी तब्बल 3,20,43,008.18 इतक्या रुपयांचे काम प्रत्यक्षात झालेलेच नाहीत, असा गौप्यस्फोट आपचे AAP सचिव संदीप देसाई यांनी केला.

या सर्व कामांचा दर्जा राखला जावा यासाठी व्हिजिलन्स अँड क्वालिटी सर्कल कंट्रोल ही मानक नियमावलीचा अवलंब करून त्रयस्थ तांत्रिक परीक्षण (थर्ड पार्टी ऑडिट) करायचे आहे. या टेस्टिंग चार्जेस पोटी 68 लाख रुपये देण्यात येणार आहे. एका रस्त्यासाठी 46 वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात, परंतु याचा कोणताही अहवाल अद्याप महापालिकेकडे उपलब्ध नाही, असा दावा देखील 'आप'कडून करण्यात आला आहे.

100 कोटी पैकी महापालिकेला 30 कोटी द्यावे लागणार आहेत. हा कोल्हापूरच्या नागरिकांचा पैसा आहे. त्यामुळे या रस्त्यांचा दर्जा राखला गेला आहे का हे बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व एस्टीमेट, डिझाईन, टेस्टिंग अहवाल, काढलेले कोअर व सर्व संबंधित कागदपत्रे घेऊन पंचनामा करण्याचा इशारा 'आप'ने दिला आहे.यावेळी शहराध्यक्ष 'आप'चे उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयुर भोसले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT