Hasan Mushrif Rajesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur NCP: दादांनी शब्द पाळला! कागलमधून मुश्रीफ तर चंदगडमधून राजेश पाटलांवर भरोसा

Mushrif from Kagal, Patil from Chandgad: कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडमधून राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Rahul Gadkar

Ajit Pawar NCP News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. 38 मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार जाहीर केले असून कोल्हापुरातील विद्यमान आमदारांना संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी चंदगडमध्येही आपला वादा पूर्ण केला आहे.

कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडमधून राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान चंदगडमधून महायुतीकडून भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे देखील इच्छुक होते. मात्र राजेश पाटील यांची उमेदवारी घोषणा होताच महायुतीतून पाटील यांच्या उमेदवारीला ब्रेक मिळाला आहे. दरम्यान चंदगडमधून शिवाजीराव पाटील यांची भूमिका काय असणार हे देखील पाहणी महत्त्वाचे आहे.

सलग 25 वर्ष कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची लढत निश्चित आहे. सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना विकास कामांचा डोंगर हा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या जमेची बाजू आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर मतदारसंघात त्यांच्याबाबत नाराजी आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता निवडणुकीतील आव्हान ते कसे पेलणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 1998 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सामना शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यासोबत झाला. मात्र पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकीत त्यांचा विजय झालेला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघातून दुसर्‍यांदा राजेश पाटील यांना संधी दिली आहे. या मतदारसंघातून भाजपकडून शिवाजीराव पाटील आणि संग्रामसिंह कुपेकर हे देखील इच्छुक होते. मात्र विद्यमान जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने राजेश पाटील यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात होती.

शिवाय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्या उमेदवारांची घोषणा करत महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला होता. मात्र राजेश पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपकडून त्यांच्या उमेदवारीची आशा संपुष्टात आली आहे. दरम्यान शिवाजीराव पाटील नेमकी भूमिका काय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT