Ajit Pawar Candidate List : चेतन तुपेंना 'ग्रीन सिग्नल' तर सुनील टिंगरेंना 'स्पीड ब्रेकर'; वडगाव शेरी भाजपाच्या वाट्याला ?

Vadgaon Sheri Assembly constituency : पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहेत.
Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar- Sunil Tingresarkarnama
Published on
Updated on

Sunil Tingre News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार चेतन तुपे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.

पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस कडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे निश्चित करण्यात आला आहे.

तसेच मावळमधून सुनील शेळके, हडपसरमधून चेतन तुपे, जुन्नरमधून अतुल बेनके, इंदापूर मतदारसंघातून दत्तात्रय भरणे, पिंपरीतून अण्णा बनसोडे, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते आधी नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Ajit Pawar- Sunil Tingre
Manoj Jarange Patil : सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणाऱ्या जरांगेंनी निवडणूक लढवावी का? सर्वेक्षणात 'ही' मोठी माहिती समोर

पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. यातील एका विधानसभा मतदारसंघात म्हणजेच हडपसरचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केला आहे. मात्र वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बोलणे सुरू आहेत. भाजपकडून ही जागा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या जागेच्या बदल्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला देण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे देखील काही दिवसांपूर्वी समोर आलो होते. त्यामुळे सुनील टिंगरे यांची धाकधूक वाढली असून भाजपचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या आशा मात्र पल्लवीत झाली आहे.

हडपसर मध्ये बंडखोरीची शक्यता ?

हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे ठेवावा यासाठी ते आग्रही होते. मात्र आता राष्ट्रवादीच्या वाटेला हा मतदारसंघ दिल्याने उद्या (गुरुवारी) मेळावा घेऊन नाना भानगरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar- Sunil Tingre
Mahim Assembly Election : मनसेकडून अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com