Gokul Elections: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीचे राजकीय गोडवे आज देखील गायले जातात. मंत्री मुश्रीफ हे महायुतीचे तर आमदार पाटील हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत.
गोकुळच्या राजकारणात अद्याप त्यांची मैत्री कायम आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्धार झाल्यानंतर अजूनही मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटलांच्यात छुपी मैत्री आहे. असा समज करून अवसायानात निघालेल्या संस्थांवर कारवाईची मोहीम सुरूच आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता आम्ही सतेज पाटलांच्या विरोधात ढाल आणि तलवार घेऊन जाऊ का? असा सवाल उपस्थित केला आहे.
महापालिका, जिल्हापरिषद निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढलो. अजून किती पटवून द्यायचे की, आम्ही महायुतीचे आहोत, त्यासाठी आता बंटी पाटलांसमोर ढाल तलवार घेऊन जायचे काय? असा उद्विग्न सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
ज्यांच्याकडे ठराव अधिक त्याला अधिक जागा हे सूत्र आहे. एकूण मतदार भागिले २५ टक्के गणित असेल. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याचा पुनरुच्चार केला आहे. असेही मुश्रीफ म्हणाले.
आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात आजपर्यंत सर्व निवडणुका लढलो असल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळमध्येही त्यांच्या विरोधातच लढणार असल्याचे स्पष्ट केले. मुश्रीफ म्हणाले, ''आम्ही महायुती म्हणूनचं लढणार आहे. यापूर्वी आमदार सतेज पाटील गोकुळमध्ये शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करणार होते, तेथे माझ्या मुलाला अध्यक्ष केले. यावरून मी त्यांचे ऐकत नाही हे स्पष्ट आहे. शिवाजी पाटील यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.