

Gokul Politics: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील संबंध अधिक ताणले गेलेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे खेळ सुरू असून आज आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक रणनीती मुश्रीफ मुक्त अशीच असणार अशी भूमिका व्यक्त केली ते गोकुळ दूध संघाला भेट दिल्यानंतर बोलत होते.
मुश्रीफमुक्त गोकुळ अशीच रणनीती अशीच माझी भूमिका कायम असणार अशी प्रतिक्रिया आमदार शिवाजी पाटील यांनी दिली आहे. गोकुळमधील राजकारणाबाबत बोलत असताना त्यांनी मुश्रीपांचा तीव्र विरोध केला. भाजप संपवण्यासाठीच त्यांनी पद्धतशीरपणे काम करत असल्याची टीका केली. भाजपमुक्त काम मुश्रीफ यांनी केलं आहे. महायुतीचा कोणताही नियम मुश्रीफांनी पाळलेला नाही. भाजप सोडून प्रत्येकाशी त्यांनी आघाडी केली. हा पक्ष कसा संपेल यासाठी त्यांनी सिस्टिमॅटिक पद्धतीने काम केलं, त्यामुळं माझा मुश्रीफांना कायम विरोध असेल आमदार शिवाजी पाटील म्हणाले.
दरम्यान, आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघास भेट देत प्रशासक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासक संजयकुमार सुद्रिक यांच्याशी गोकुळ दूध संघाच्या विविध प्रशासकीय, शेतकरी व दूध उत्पादकांच्या हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गोकुळ दूध संघ अधिक पारदर्शक, शेतकरी हिताचा व सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय देणारा व्हावा, यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी यावेळी सांगितले.
आमदार शिवाजी पाटील यांच्या भूमिकेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. मुश्रीफमुक्त गोकुळ कोण करणार सभासद की आमदार शिवाजी पाटील? ते पूर्णपणे व्यक्तिगत टीका करत आहे, हे सगळं राजकीय सुरू आहे. गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढली जाणार, असे मुश्रीफ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.