Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी कंडकाच पाडला; छत्रपती संभाजी महाराजांसाठी...

Kolhapur Politics :  लोकर्पण सोहळ्याला पालकमंत्री उपस्थित राहत असल्याने अधिकाऱ्यांची कोंडी

Rahul Gadkar

Kolhapur : महापालिकेची परवानगी नसताना देखील कोल्हापूर शहरातल्या पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. परवानगी नसलेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. मात्र, महापालिकेची परवानगी नसताना पालकमंत्री कसे उपस्थित राहणार, यावरून चर्चा होते आहे .मात्र,. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसाठी काय शिक्षा होईल ते होईल. पण आजच उद्घाटन समारंभ पार पडणार, अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी या विषयाचा कंडकाच पाडला.

लोकर्पण सोहळ्याला मी गेलो नाही तर माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होईल. लोकार्पण सोहळा समितीचे लोक माझ्याकडे पत्रिका घेऊन आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज हे माझ्यासाठी दैवत आहेत. त्यांचे कार्य हे माझ्यासाठी मी भाग्य समजतो, असे मुश्रीफ म्हटले.

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. अनेक आंदोलन झाल्यानंतर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आज सायंकाळी या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. मात्र, या लोकार्पण सोहळ्यासाठी महापालिकेने परवानगी दिली नाही. पण या सोहळ्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ असल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विषय संवेदनशील असल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याने आयोजकांना नोटीस पाठवल्या आहेत.पापाची तिकटी येथील दोन्ही रस्ते एकेरी मार्गाचे आहेत. या रस्त्यावर दिवसाप्रचंड वाहतूक असल्याने रात्री क्रेनने म्युरल बसवले. मात्र, काम अपूर्ण असल्याने महापालिकेतर्फे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. असे सांगण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्ष पालकमंत्रीच या लोकर्पण सोहळ्याला येत असल्याने महापालिका अधिकारी कोंडीत सापडले आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT