Kolhapur Political News : पालिका अधिकाऱ्यांची मुश्रीफांकडून खरडपट्टी..

Municipal Corporation on development works : कोल्हापुरातील विकासकामावरून आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना दिला सज्जड दम
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : कोल्हापुरातील विकासकामावरून आरोपांच्या पिंजऱ्यात उभा केलेल्या महानगरपालिका अधिकाऱ्यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज चांगलीच खरडपट्टी केली. झूम प्रकल्प येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आयुक्त के. लक्ष्मी यांना झापले. मंजूर असलेली कामे तातडीने का पूर्ण केली नाही ? रस्ते प्रकल्पाचे काम कमिशन मिळालं नाही म्हणून थांबले असल्याचे माझ्या कानावर आले आहे.

येत्या चार दिवसात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना बदला, असा सज्जड दम मुश्रीफ यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला. आयुक्तांना आयुक्त होण्यात इंटरेस्ट आहे का? जिल्हाधिकारी होण्यात इंटरेस्ट आहे, हे मला माहिती नाही. पण जिल्हाधिकारी ते होणार नाहीत, असेही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आयुक्त के. लक्ष्मी यांना खडसावले.

Hasan Mushrif
Uddhav Thackeray Morcha : उद्धव ठाकरेंच्या 'धारावी बचाव' मोर्चाला सुरुवात

दरम्यान मुश्रीफ यांचे भाषण सुरु असताना, कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ हे इकडे तिकडे बघत होते. त्यावेळी मुश्रीफ यांना चांगलाच संताप आला. अडसूळ तुम्ही इकडे तिकडे बघू नका! मी तुम्हाला दिवाळीपूर्वी खड्डा बुजवण्यास सांगितले होते. एकही खड्डा न ठेवण्याचा सल्ला दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर झूम प्रकल्पाबाबत कामे मार्गी लावा, असे आदेश दिले होते. ही कामे का झाली नाहीत. चार दिवसात ही काम पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांना बदला. तो ग्रामविकासचा माणूस आहे, मीच महापालिकेत आणला आहे. अशा शब्दात मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना झापले.

(Edited by Amol Sutar)

Hasan Mushrif
Pune Bjp : पक्षाच्या सर्व्हे आधीच भाजप इच्छूकांचे दिल्लीश्वरांकडे साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com