Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif: मुश्रीफांचा मास्टरस्ट्रोक! जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच?; सहा महिन्यापूर्वीच आखली होती रणनीती

Hasan Mushrif: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दुखत्या नशीवर बोट ठेवत कोल्हापुरातील भाजप नेत्यांकडून सातत्याने दबाव टाकला जात आहे.

Rahul Gadkar

Hasan Mushrif: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दुखत्या नशीवर बोट ठेवत कोल्हापुरातील भाजप नेत्यांकडून सातत्याने दबाव टाकला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटपात याचा प्रत्यय आला. पण मुश्रीफांनी मास्टरस्ट्रोक सहा महिन्यांपूर्वीच खेळला असल्याचं दिसतंय. कारण एका वाक्यातच भाजपच्या लोकांचा आवाजच त्यांनी बंद केला आहे.

मागील महापालिकेच्या सत्तेतील राष्ट्रवादी पक्ष असून देखील राष्ट्रवादीला केवळ 14 जागा लढवता आल्या. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. त्यानंतर देखील महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार जिल्हा परिषदेवर अध्यक्ष राष्ट्रवादीचा काँग्रेस होणार हे निश्चित असताना भाजपकडून अध्यक्षपदाचा दावा केला जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्या-प्रतिदाव्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका वाक्यातच भाजप नेत्यांचा पिक्चर पाडला आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी मुरगूडला नुतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार पार पडला. यावेळी बोलताना, मी 6 महिन्यापूर्वीच विमानतळावर मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. कोल्हापूर शहरात महापौर भाजपचा होईल. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुरगूड येथे रणजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या भव्य सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटात निराशा येईल अशी शक्यता आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्षपदाचा दावा केला होता. तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनसुराज्य शक्ती हा भाजपचाच आत्मा असल्याने दोघांच्या मिळून 18 सदस्य निवडून आले आहेत त्यामुळे भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर होईल असाही दावा केला होता. या ताव्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत चुरस आणि ईर्षा अध्यक्षपदासाठी सुरू आहे हे चव्हाट्यावर आले होते. सध्या या हालचाली शांत असल्या तरी राज्य सरकारकडून अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याला वेग येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT