Maharashtra Politics News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तब्बल ४० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मुश्रीफांवर करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांनी तब्बल ४० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मुश्रीफांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरु केलं आहे. तसेच यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
हसन मुश्रीफांनी कारखान्यासाठी पैसे गोळा करत ते पैसे वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर मुश्रीफ यांच्यावर ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप मुश्रीफांच्या समर्थकांनी केला आहे. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला जबाबदार प्रशासन राहिल, असा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना ताब्यात देखील घेतले होते. तर त्याआधी मुश्रीफांच्या कागलच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता.
त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्यावर तब्बल ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.