Pune By-Election : पोटनिवडणूक प्रचार बंदोबस्तातील हलगर्जीपणा अंगलट; 31 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

गेल्या आठड्याभरापासून मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील बडे नेतेमंडळी पुण्यात ठाण मांडून होती.
Pune Police
Pune PoliceSarkarnama

Pune By-Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची प्रचार शुक्रवारी बंद झाला. गेल्या आठड्याभरापासून मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील बडे नेतेमंडळी पुण्यात ठाण मांडून होती. या सर्व नेत्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनावरही मोठा ताण होता. अशात या नेतेमंडळींच्या बंदोबस्ताला उशिरा पोहचणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

कसबा पोटनिवडणुकांच्या प्रचारादरम्यान पुण्यातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बंदोबस्तात उशिरा पोहचणाऱ्या, कसूर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी रोजी स्वारगेट चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्तात वेळेत पोहचण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या.

Pune Police
Nagpur : देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री असल्याचा नागपूरला झाला ‘हा’ मोठा फायदा !

सकाळी नऊ वाजता बंदोबस्त सुरु झाला. पण स्वारगेट, भारती विद्यापीठ, छावणी, सहकारनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बंदोबस्तात तासभर उशिरा पोहचले. सकाळी नऊ वाजता बंदोबस्तात बोलवूनही दहा वाजण्याच्या सुमारास बंदोबस्तात पोहचलेल्या ३१ पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आदी नेते पुण्यात आले होते. पण पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी वेळेत न पोहचल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. ड्युटीवर वेळेत हजर न राहिलेल्या अशा ३१ जणांवर स्मार्तना पाटील यांनी सक्त ताकीद दिली आहे. संबंधित ३१ कर्मचाऱ्यांचे वर्तन शिस्तीला धरुन नसल्याचे उपायुक्त पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com