Mahesh Patil faces a legal setback after the High Court declined to provide protection from arrest and criminal proceedings in the alleged fake caste certificate case. sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahesh Patil News : भाजप झेडपी सदस्य महेश पाटलांना उच्च न्यायालयातही दणका, गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा!

High Court Fake Caste Certificate Case : पट्टणकोडोली मतदारसंघातून अनुसूचित जाती (लिंगदेर) प्रवर्गातून निवडून आलेले महेश पाटील हे प्रत्यक्षात लिंगायत समाजातील असल्याचा आरोप पुरुषोत्तम भुजिंगे व तुषार बाणदार यांनी केला होता.

Rahul Gadkar

Fake Caste Certificate : बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक लढवल्या प्रकरणी भाजप जिल्हा परिषद सदस्य महेश (दरगोंडा) बसगोंडा पाटील यांना उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने दणका दिला. जात पडताळणी समितीने नोंदवलेल्या गंभीर निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्यांच्याविरोधातील संभाव्य फौजदारी कारवाईला कोणतेही संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला.

पट्टणकोडोली मतदारसंघातून अनुसूचित जाती (लिंगदेर) प्रवर्गातून निवडून आलेले महेश पाटील हे प्रत्यक्षात लिंगायत समाजातील असल्याचा आरोप पुरुषोत्तम भुजिंगे व तुषार बाणदार यांनी केला होता. या तक्रारीनंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सुनावणी घेऊन त्यांचा ‘लिंगडेर’ जातीचा दाखला अवैध ठरवला.

या निर्णयाविरोधात महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी प्रमाणपत्र कायदेशीर प्रक्रियेनुसार मिळाल्याचा दावा करत संभाव्य अटक अथवा एफआयआरपासून संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, न्यायमूर्ती मिलिंद जाधव व न्यायमूर्ती देशपांडे यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली.

“जात पडताळणी समितीने नोंदवलेले प्रतिकूल निष्कर्ष आणि बोगस कागदपत्रांबाबतच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही,” असे सर्किट बेंचने स्पष्ट केले. त्यामुळे महेश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात फसवणूक व बनावटगिरीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT