Karad News: काँग्रेस नेते आणि यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख निवास थोरात यांचा अर्ज बाद ठरल्याचा निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेतूनच थोरात बाहेर पडले आहेत.
गत महिन्यात अर्ज छाननीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुरलीधर गायकवाड यांनी थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत त्यांचा अर्ज अवैध झाला. या विरोधात थोरात यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते.
गायकवाड यांनी थोरात यांच्यासह नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. पण प्रादेशिक सहसंचालकांच्या निकालाला आव्हान देत मुरलीधर गायकवाड यांनी थोरात यांच्या निकालावर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिथे दोन्ही बाजूकडून युक्तिवाद झाले. त्यानंतर न्यायालयाने प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या निर्णयाला स्थगिती देत अर्ज अवैध असल्याचा निकाल कायम ठेवला.
त्यामुळे थोरात सह्याद्री कारखाना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यांचे नाव आता मतपत्रिकेवर राहणार नाही. याचा थोरात यांचे पॅनेलमधील सहकारी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पण आता मागे हटणार नाही. ही निवडणूक जोमाने लढवणा आणि विजयश्री खेचून आणणार असा निर्धार, थोरात यांनी केला आहे.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी.डी. पाटील पॅनेल, भाजप आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह उंडाळकर यांच्या नेतृत्वात दुसरे पॅनेल आणि पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील कदम आणि निवास थोरात यांचे तिसरे पॅनेल आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 21 जागांसाठी 70 अर्ज कायम राहिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.