Congress Sanjay Balgude : महापालिका निवडणुका होणारच नाहीत, काँग्रेस नेत्याने थेट दावाच केला

Local Body Election : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. पण आता या निवडणुकी संदर्भात धक्कादायक दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे.
Local Body Election
Local Body ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात धक्कादायक दावा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांच्या उत्साहावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बालगुडे यांनी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणारच नाहीत. महापालिकेच्या निवडणुका होणारच नाहीत, असा धक्कादायक दावा केला आहे. ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यासह महानगरपालिका क्षेत्रातील काँग्रेस नगरसेवकांचा उत्साह कमी दिसत आहे. तर काही नगरसेवक महायुतीतील पक्षाच्या वाटेवर आहेत. अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यावर प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांना प्रश्न विचारताच महायुतीवर हल्लाबोल करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. या निवडणूक न होण्यामागे 6 मे ला पुढील सुनावणी आहे. पुढे गेल्यास कोर्टाला सुट्टी लागणार आहे. त्याची सुनावणी जून किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. असे असले तरी काँग्रेस मधील नगरसेवकांचा उत्साह कमी आहे. हे आपल्याला मान्य असल्याचं बालगुडे यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना संबोधन करताना आम्हाला फक्त लढायचं माहिती. महापालिकेच्या निवडणुका होणार नाहीत. विधानसभा निवडणुका होण्याला पाच वर्षाचा काळ आहे. त्यामुळे केवळ संघर्ष करणे हेच कार्यकर्त्यांच्या हातात आहे. तुम्हाला संघर्ष करायचा आहे. आज सल्ला आम्ही कार्यकर्त्यांना दिला असल्याचं बालगुडे यांनी स्पष्ट केले.

Local Body Election
Sangli Congress : 'नेत्यांमुळेच कार्यकर्ता खचतोय', काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष थेट पक्ष निरीक्षकालाच भिडला

लाडक्या बहिणी पंधराशेवरून पाचशेवर येतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनो गडबड करू नका. जरा तग धरा. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे. केवळ भावना भडकवण्याचा प्रयत्न भाजप मंडळी करत असल्याचा आरोप बालगुडे यांनी केला. महायुतीमध्ये वाईट परिस्थिती आहे. कोणत्याही क्षणाला काहीही होऊ शकते.

Local Body Election
Congress vs BJP Maharashtra : हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारविरुद्ध 'दांडपट्टा' सुरूच; आता फडणवीसांना 'गजनी' म्हणाले (VIDEO)

मंगळवारी त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. तत्कालीन काळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना पीएमआरडीचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. असे अनेक विकास कामे आहेत जे शिंदेंच्या आमदारांनी मंजूर केली होती. मुख्यमंत्र्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये नक्कीच गडबड असल्याचं बालगुडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com