Balasaheb Patil, Sadabhau Khot
Balasaheb Patil, Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : लोकप्रियतेसाठीच त्यांची शरद पवारांवर टीका....बाळासाहेब पाटील

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad News : सदाभाऊ खोत हे सरकारमध्ये आमदार, मंत्री होते. आजही ते सत्तेतील पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे शेतकऱ्याचे प्रश्न मांडले पाहिजेत. भाजपाचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत हे लोकप्रियता मिळावी, यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचे मत माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

रयत क्रांती संघटनेने काढलेल्या शेतकऱ्यांच्या पदय़ात्रेच्या पार्श्वभुमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil बोलत होते. ते म्हणाले, लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे महत्वाचे स्तंभ असतात. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis आणि मंत्रीमंडळाकडून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करायची असते.

विरोधी मंडळीनी जनआंदोलन, रस्त्यावर येणे आणि पदयात्रा काढणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे सदाभाऊ खोत हे सरकारमध्ये आमदार, मंत्री होते. आजही ते सत्तेतील पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे शेतकऱ्याचे प्रश्न मांडले पाहिजेत.

भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत हे लोकप्रियता मिळावी, यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. केंद्र व राज्यातील यंत्रणांचा वापर राजकीयदृष्ट्या केला जात आहे. ज्याच्यावर पूर्वी आरोप झाले ते आता भाजपमध्ये गेले, शिंदे गटात गेले, त्यांची चौकशी होत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम सुरू सरकारकडून सुरू आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार होण्यापूर्वी मला मंत्रीपद मिळणार, पालकमंत्रीपद मिळणार असे यापूर्वी कोणताही आमदार म्हणत नव्हता. त्यामुळे जे आमदार नाहीत, त्यांना मंत्रिपद मिळण्याबाबत साशंकता आहे, असे मत त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या मंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT