NCP News : चौंडीतल्या अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमासाठी रोहित पवारांना परवानगी नाकारली; पुन्हा संघर्षाची चिन्हे?

Rohit Pawar News : सरकारी कार्यक्रमामुळे रोहित पवारांना परवानगी नाकारली?
Rohit Pawar News :
Rohit Pawar News : Sarkarnama

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीमिमित्त मागील वर्षी आयोजित कार्यक्रमात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषेदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात कार्यक्रमाच्या आयोजनावरून संघर्ष उफाळून आला होता. यंदाच्या वर्षीही या कार्यक्रमाच्या आयोजनावरून संघर्ष निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ३१ मे रोजी साजरी होत आहे. जयंतीनिमित्त या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तर याच ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, पवारांची ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून नाकरण्यात आली आहे. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनाकडून पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar News :
Eknath Shinde With MP : एकनाथ शिंदेनी रात्री उशीरापर्यंत घेतली खासदारांची बैठक; लोकसभेसाठी प्लॅन काय?

जिल्हाधिकाऱ्यांनी रोहित पवार यांची परवानगी नाकारल्यामुळे आता ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन, याठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त करण्यात येणार आहे. चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचा जन्मगाव मात्र मागील वर्षांपासून ह्या ठिकाणी राजकीय संघर्ष पेटताना दिसत आहे.

मागील वर्षी जयंती दिनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोहित पवार (Rohit Paawar) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) एकाच वेळी आल्याने संघर्ष झाल्याचे दिसून आले. यावेळी पडळकर यांना चापडगाव येथेच त्यांना प्रशासनाकडून रोखण्यात आले होते. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा कार्यक्रम आटोपल्यानंतरच पडळकरांना चौंडीत सोडण्यात आले होते.

Rohit Pawar News :
Pune Vetal Tekdi : आमदार शिरोळे म्हणतात स्थगिती दिली; मनपाकडून मात्र वेताळ टेकडी रस्त्याची चाचपणी?

दरम्यान राज्यात सत्तापालॉट होऊन शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे- फडणवीस सरकारकडून या ठिकाणी सरकारच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखांचा निधी देण्यात येणार आहे. सरकारी कार्यक्रम असल्यामुळे रोहित पवार यांच्या वैयक्तिक स्तरावरील कार्यक्रमाला परवानगी नाकारली गेल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com