Satara News: सदाभाऊंचा महामार्गावरच ठिय्या, अन॒ पोलिसांची तारांबळ...

Sadabhau Khot कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेस प्रारंभ झाला होता.
Sadabhau Khots Andolan
Sadabhau Khots AndolanPramod Ingale, satara

Satara News : कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाय, रयत क्रांती संघटनेचा विजय असो..., सदाभाऊ तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्राचे आज साताऱ्यात आगमन झाले. तत्पूर्वी शिवराज चौकात श्री. खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर पदयात्रा बॉम्बे चौकातून सातारा Satara शहरातील पोवई नाका येथे आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेस प्रारंभ झाला होता.

आज ही यात्रा साताऱ्यात दाखल झाली. तत्पूर्वी खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपाच्या दरम्यान, यात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडली. पोलिसांनी अक्षरशा हात जोडले. पण, आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे सदाभाऊंनी ठणकावले.

Sadabhau Khots Andolan
Satara News : कास अनाधिकृत बांधकामे : हरित न्यायाधिकरणांचे जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश...

श्री. खोत म्हणाले, कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाढ्याचे प्रश्न घेवुन पदयात्रा काढत असून या तीन दिवसात सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देईल अशी आशा आहे. तीन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनांने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत.

Sadabhau Khots Andolan
Sadabhau Khot News : फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करतील : सदाभाऊ खोत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com