Solapur, 20 August : बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवरील अत्याचार प्रकरणी समाजातून तीव्र पडसाद उमटत आहेत. बदलापूरमधील संबंधित शाळेसमोर सकाळपासून पालकांचे आंदोलन सुरू आहे. राजकीय क्षेत्रातूनही त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
बदलापूर अत्याचाराची घटना ही एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. याचवेळ त्यांनी गुजरातमध्ये बलात्काऱ्यांचे हार तुरे घालून स्वागत केल जातं. पदयात्रा काढली जाते, याचा परिणाम समाजात कसा होताना दिसणार आहे? असा सवाल उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.
खासदार प्रणिती शिंंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे. चार वर्षांच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल, तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे.
डॉक्टर महिलेवर झालेला अत्याचार, त्यानंतर बदलापूरमधील घटना (Badlapur sexual abuse) हे पाहून मुलींनी कामावर जावे की नाही. पालकांनी आपल्या लहान मुलींना शाळेत पाठवावं की नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं घडत असेल तर त्याची नोंद घेतली जात नाही. एफआरआय नोंदविण्यासाठी चार चार दिवस लावले जात असतील तर आपला समाज कुठे चालला आहे, याचा विचार आपण केला पाहिजे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये बलात्काऱ्यांचे हार तुरे घालून स्वागत केल जातं. पदयात्रा काढली जाते, याचा परिणाम समाजात कसा होताना दिसणार आहे? हेच होणार आहे ना समाजात. जेव्हा सत्ताधारी असे वागतात आणि प्रशासन त्या गोष्टीचं समर्थन करतं. तेव्हा समाजातील विकृत प्रवृती वाढतच जाऊ शकते. अशा वेळी काय करावं. हताश होऊन सर्वांनी बसायचं का? असा सवालही शिंदे यांनी विचारला.
त्या म्हणाल्या, समाजाने आता सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का..? राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून काहीच होणार नाहीये. सध्या जो तीव्र निषेध होतो आहे, हा निषेध रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा तर द्यावा. पण अजून किती दिवस हे चालणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.