Old Pension scheme : खासदार प्रणिती शिंदेंच्या पहिल्याच प्रश्नाला धक्का; 'जुन्या पेन्शन'बाबत केंद्राचा मोठा निर्णय

MP Praniti Shinde question to central government on old pension : खासदार प्रणिती शिंदे यांनी जुन्या पेन्शन संदर्भात केंद्र सरकारला प्रश्न केला. यावर लेखी उत्तर देत जुन्या पेन्शनबाबत कोणताच निर्णय आणि निकाल नाही, असे म्हटले आहे.
Old Pension scheme
Old Pension scheme Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जुन्या पेन्शनबाबत निराशाजनक बातमी आहे. जुन्या पेन्शनबाबत कोणताच निर्णय आणि निकाल नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी यावर सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्ट लेखी उत्तर दिलं आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. केंद्राच्या या निर्णयाविरेधात राज्य आणि केंद्र सरकार कर्मचारी संघटनांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता असून, आंदोलन छेडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या (Congress) खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा सभागृहात पहिलाच प्रश्न जुन्या पेन्शन संदर्भात विचारला. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने केली जाते. ही योजना लागू व्हावी यासाठी राज्यात आणि देशात मोठी आंदोलनं देखील झाली. राज्य सरकार जु्न्या पेन्शन योजनेवर काम करत आहे. परंतु अजूनही कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनांचा लाभ मिळालेला नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची देखील जुन्या पेन्शन संदर्भात मागणी आहे. त्याच अनुषंगाने खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. परंतु केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात नकार दिल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.

Old Pension scheme
Aditya Thackeray On Union Budget 2024 : भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? आदित्य ठाकरेंची बजेटवर संतप्त प्रतिक्रिया

राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी केला होता. जुन्या पेन्शन संदर्भात सरकारचा कोणताच विचार नाही, असे स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने (central government) दिले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. आता, सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसतात की, कोणता अन्य मार्ग अवलंबतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यास भाजप (BJP) सरकारला ते आव्हानात्मक ठरू शकते.

Old Pension scheme
Share Market Live : शेअर बाजार कोसळला; अर्थमंत्र्यांची ‘ही’ घोषणा ठरली कारणीभूत...

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून आक्रमक आहेत. गेली अनेक वर्ष आंदोलन चालू असून, सरकारचे लक्ष वेधले जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सातत्याने सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात होती. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील सरकारी कर्मचारी संघटनांच्या या मागणीला पाठिंबा दिला होता. आता केंद्र सरकारने जुन्या पेन्शन संदर्भात उत्तर दिल्याने जु्न्या पेन्शनसंदर्भात सरकारच्या पातळीवर विषय मिटल्याचे दिसते. खासदार प्रणिती शिंदेंच्या उत्तरावर सरकारने लेखी उत्तर देत जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात कुठलाच विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com