Assembly Election 2024 :भाजप ॲक्शन मोडवर; विधानसभेसाठी पंकजा मुंडे, आशिष शेलार, नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

BJP Political strategy : लोकसभा निवडणुकीत महायुतील अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाला तर अवघ्या नऊच जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मायक्रो लेव्हलवर तयारी करण्यात येत आहे.
Pankaja Munde-Ashish Shelar-Narayan Rane
Pankaja Munde-Ashish Shelar-Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 August : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष खडबडून जागा झाला आहे. त्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत आहे. समाजातील छोट्यातील छोट्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

त्या दृष्टीनेच विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाला (BJP) तर अवघ्या नऊच जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मायक्रो लेव्हलवर तयारी करण्यात येत आहे. राज्यातील दलित, आदिवासी, मराठा समाजापर्यंत सरकारच्या योजना पोचवून जास्तीत जास्त जागांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप जरी महायुतीमध्ये निवडणूक लढवत असला तरी राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निवडणूक जिंकण्यासाठीची जबाबदारी असणार आहे.

Pankaja Munde-Ashish Shelar-Narayan Rane
Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांच्या घरांवर ईडीचे छापे; पुणे, शिक्रापुरात कारवाई

राज्यातील मराठा समाजासह, ओबीसी, आदिवासी, दलित या समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपची वेगळी रणनीती असणार आहे. त्यासाठी फडणवीस यांच्यासह या हे तीनही नेते राज्याचा दौरा करणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दौरे आणि कार्यक्रम असताना भाजप मात्र शांत दिसून येत होता. मात्र, सप्टेंबरमध्ये हे चारही नेते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, त्यानंतर विधानसभा निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी ठरवली जाणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्री काढली जात आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढवली जाणार आहे, त्याच मतदारसंघातून ही यात्रा फिरवली जात आहे.

Pankaja Munde-Ashish Shelar-Narayan Rane
Devendra Fadnavis Delhi Tour : महायुतीत काय घडतंय; फडणवीसांनी केली मध्यरात्री दिल्लीवारी, अमित शाहांसोबत दीड तास खलबतं

काँग्रेसनेही विभागीय बैठकांना सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, त्या तुलनेत भाजपकडून केवळ बैठका घेतल्या जात आहेत. जनतेच्या दरबारात अजूनही ते आलेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com