Praniti Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde News : टक्केवारी अन्‌ सत्तेसाठी मी राजकारणात आलेले नाही : प्रणिती शिंदे

Vijaykumar Dudhale

Solapur, 1 April : मी ईडी बिडीला घाबरत नाही. मी राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आलेली नाही, त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या, मग बाकी ते टेन्शन माझं, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील सभेत बोलताना आमदार शिंदे (Praniti Shinde) यांनी हे आवाहन केले. त्या म्हणाल्या, दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे. मागच्या 10 वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघावर (Solapur Lok Sabha Constituency) खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षांत मतदारांनी सगळं भाजपला दिलं. मात्र, त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला आहे, भाजपने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागच्या 10 वर्षांत सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या (BJP) खासदाराने काय काम केलं, हा एकच प्रश्न त्यांना विचारा. त्यांची बोलती बंद होईल. ऐन इलेक्शनच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला, म्हणजे ही लोकं आपणाला भीक देतायत की काय.. यांच्याकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना रातोरात अटक करतात, असे प्रणिती शिंदे यांनी नमूद केले.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, जर भाजप 400 पार जागा जिंकणार असा तुम्हाला आत्मविश्वास आहे तर एवढी भीती का आहे तुम्हला..? ही लोकं 400 सोडा मुश्किलीने 100 च्या पण पार जाणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे. समोरून उज्ज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलिंडरवर काय शिजवायचं..? हाथी के दात दिखाने के एक और खाने के एक’. भाजपच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्षे मागे गेलाय, तर आपला देश 50 वर्षे मागे गेलाय.

आपल्या देशाला भाजपच्या (BJP) विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म-जात करून लोकांमध्ये तेढ निर्माण करताहेत, आधी आपण असे नव्हतो. निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो.

सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करताहेत. ज्या दिवशी असं व्हायला लागेल, त्यादिवशी लोकशाहीला खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवत आहेत, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT