Political News : परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी उमेवारी अर्ज भरला आहे. जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महायुतीची जाहीर सभा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी सभेत मार्गदर्शन केले. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत महादेव जानकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आरबीआयच्या कार्यक्रमासाठी आज मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात काय सुरू आहे, याची विचारणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावेळी महादेव जानकर (Mahadev Jankar ) यांचा उमेवारी अर्ज भरण्यासाठी आपण परभणीला जाणार असल्याचे फडणवीसांना सांगितले. त्यावेळी जानकरांना सांगा, मी तुमची लोकसभेत वाट पाहतोय, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सभेत सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांनी सांगितले महादेव जानकरांना सांगा मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची जबाबदारी त्यांची आहे. दरम्यान, महायुतीने महादेव जानकर यांनी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेद्वारे शक्तिप्रदर्शन केले.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात महादेव जानकर यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. महादेव जानकर म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान. जानकर यांनी पाच वर्षे माझ्या मंत्रिमंडळात काम केले. ते आपल्या खात्याचे काम अतिशय नेटाने करायचे. पाच वर्षांमध्ये त्यांच्यावर एक रुपयाचा डाग लागला नाही. जानकरांना मत म्हणजे मोदींना मत, असे फडणवीस म्हणाले.
मोदींनी विकासकामे करताना जात धर्म पाहिले नाहीत. मागील निवडणुकीत आपण महाराष्ट्रातून 41 खासदार मोदींना दिले. या वेळी 41 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. परभणीची जागा राष्ट्रवादीकडे असताना त्यांनी ही जागा जानकरांना दिली. यासाठी फडणवीसांनी अजित पवारांचे आभार मानले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.