Ajit pawar Deputy Cm :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nilesh Lankhe On NCP Crisis : 'मला काहीही नको, पण पवार परिवार एक असावा ही परमेश्वराकडे प्रार्थना'; आमदार लंकेंची भावना !

Ajit pawar Deputy Cm : "जो काय निर्णय तो मुंबई बैठकीत गेल्यावरच.."

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : "शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी, अजित दादांनी (AJit Pawar) तसेच सुप्रियाताईंनी (Supriya Sule) मला आणि माझ्या मतदारसंघाला आतापर्यंत भरभरून दिले आहे. पवार परिवाराने पारनेर मतदारसंघासाठी विकास कामासाठी मी टाकलेला शब्द कधीही खाली पडू दिला नाही. मागेल तितका निधी मला अजितदादांकडून मिळाला. कोविड काळात सुप्रियाताईंनी केलेली मदत ही अद्वितीय अशी आपल्यासाठी होती," अशी भावना पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Nanke) यांनी व्यक्त केली.

"शरद पवार साहेबांनी माझे कौतुक माझ्या घरी येऊन केले. पवार साहेबांच्या ज्या-ज्या सभेत मी असेल त्या ठिकाणी त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलं. एक मोठे मार्गदर्शन आणि विकासाचा मार्ग पवार साहेबांनी मतदारसंघाला दिला. या अशा सर्व परिस्थितीत पवार हाच माझा परिवार आहे. मला काही नको मात्र हा पवार परिवार एक असायला हवा, अशीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे," असे भावनिक उद्गार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काढलेत. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे फडवणीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. इतरही राष्ट्रवादी पक्षाच्या आठ ज्येष्ठ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यास आमदार नीलेश लंके हे उपस्थित होते. त्यामुळे ते अजित पवार गटात गेले अशा बातम्या आल्या. मात्र यावर स्वतः निलेश लंके हे पूर्णपणे आजही (4 जुलै) द्विधा मनस्थितीत असून, निर्णय घ्यावा तर तो काय घ्यावा अशी परिस्थिती माझ्यासमोर आहे, कारण संपूर्ण पवार परिवार हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी भावना आमदार लंके यांनी व्यक्त केली आहे.

पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ कमिट्यांच्या निमित्ताने आज पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा पारनेर मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार लंके यांनी पक्षाने नुकत्याच झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात बूथ कमिट्या मजबूत करण्याचे सांगितलेले आहे. त्या दृष्टीने आपण लगेचच पारनेर तालुक्यातील सर्व बूथ कमिट्या मजबूत आणि परिपूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे असं सांगितलं.

याच भाषणात त्यांनी एकूणच सध्या राष्ट्रवादी पक्षांतर्गत निर्माण झालेल्या उभ्या फुटीबद्दल भाष्य करताना आपली व्यथा व्यक्त केली. राजकारणामध्ये काही वेळेस अभिमन्यू सारखी परिस्थिती होते किंवा पाण्याच्या लाटेत ओढले गेल्यासारखी परिस्थिती होते. असं वाटतं राजकारण सोडून द्यावं आणि एखादी पंढरीची वारीच काम करत राहावं. मात्र आता राजकारणाच्या निमित्ताने पारनेर तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना जो निर्णय घ्यायचा आहे तो खूपच मोठा असा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक म्हणावा असा असेल. मात्र त्यावर काय तो निर्णय मुंबईत गेल्यानंतरच होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पारनेर मध्ये झालेल्या बूथ कमिट्या बैठकीच्या निमित्ताने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापली मते यावेळेस मांडले. काहींनी शरद पवार यांच्यासोबत जावे तर काहींनी अजित पवार यांच्यासोबत जावे असे मत मांडले. या सर्व मतांचा उल्लेख आमदार नीलेश लंके यांनी आपल्या भाषणात करताना आज आपल्याला मत मांडताना सोपं वाटतं आहे, मात्र मला निर्णय घेताना सर्वात अवघड अशी गोष्ट वाटत आहे असं सांगितलं.

आपले पवार कुटुंबाशी जोडलेलं घट्ट नातं यामुळे एकूणच सध्याची परिस्थितीत स्पष्टपणे निर्णय घेण्याचे आमदार लंके यांनी आजच्या आपल्या भाषणात टाळलं. मात्र यावेळी बोलताना विकासाचा राजकारण हा विषय त्यांनी चर्चेत घेतलेला आहे. त्यामुळे एकूणच त्यांचा रोख कुठल्या दिशेने असेल याचे अंदाज आता बांधले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT