Umesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Umesh Patil : मोहोळची राष्ट्रवादीची जागा निवडून येत नाही, हे मी पक्षश्रेष्ठीला सांगितलंय; उमेश पाटलांचा गौप्यस्फोट

Mohol NCP Dispute : माजी आमदार राजन पाटील यांच्या मागे आता मोहोळ तालुक्यातील जनता राहिलेले नाही, हे जनसन्मान यात्रा मोहोळमध्ये आली होती, त्या दिवशी मोहोळ तालुका कडकडीत बंद पळून अजितदादांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 September : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मोहोळची जागा निवडून येत नाही, हे पक्षाला सांगितलं आहे. त्यानंतरही आमदार यशवंत माने यांना उमेदवारी द्यायचा पक्षाचा अट्टाहास आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

राजन पाटील यांची राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा राजन पाटील यांना टार्गेट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या मागे आता मोहोळ तालुक्यातील जनता राहिलेले नाही, हे जनसन्मान यात्रा मोहोळमध्ये आली होती, त्या दिवशी मोहोळ तालुका कडकडीत बंद पळून अजितदादांच्या (Ajit Pawar) निदर्शनास आणून दिलं आहे. मात्र, आमच्या पक्षाच्या ते लक्षात येत नाही, त्यामुळे भूमिका घ्यावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून माझं ऐकूनही घेतल जातं नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंतही उमेश पाटील यांनी व्यक्त केली.

मागच्या सहा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोहोळमधून निवडून आला आहे, त्यामुळे राजन पाटील जिकडे, तो उमेदवार निवडून येईल, असा समज पक्षश्रेष्ठींचा असेल मात्र आता चित्र बदललं आहे. मोहोळची राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येत नाही, हे मी पक्षाला सांगितलं आहे. मात्र, यशवंत माने यांना उमेदवारी द्यायचा पक्षाचा अट्टाहास आहे. भविष्यात मोहोळमध्ये वेगळं चित्र दिसेल, असा दावाही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला.

अजितदादा जेव्हा शरद पवारसाहेबांपासून बाजूला झाले, तेव्हा मी दादांना सांगितलं होतं की राजन पाटील या माणसाला माझा विरोध राहील, हे मी अगोदरच स्पष्ट केलं होतं. राजन पाटील या व्यक्तीबरोबर काम करण्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं. मात्र, मी राजकारण सोडलं तर त्यांचा विजय होईल, त्यामुळे मी राजकारण सोडणार नाही.

आगामी निवडणुकीत राजन पाटील विरोधी लाट आहे, हे दिसून येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात राजन पाटील यांचे साम्राज्य उद्‌ध्वस्त होईल, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

अजितदादांचे जे वक्तव्य माझ्याबद्दल झालं. त्यानंतर माझ्यामुळे जर पक्षाला अडचण असेल तर मी मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा तयार ठेवला आहे. तो मी घेऊनही पक्षाकडे गेलो होतो. मात्र, पक्षाने वेळ मागितल्यामुळे मी थांबलो आहे. येत्या 4 दिवसांत पक्षाकडून त्या संदर्भात चर्चा झाली तर ठीक नाही तर मी माझ्या राजीनाम्यावर ठाम आहे, असा इशाराही उमेश पाटील यांनी पक्षाला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT