Uttam Jankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Markadwadi Voting : मी आमदारकीचा राजीनामा देतो, ‘बॅलेट’वर माळशिरसची पोटनिवडणूक घ्या; जानकरांचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

Uttam Jankar Will Resign MLA Post : मागील २०१९ च्या निवडणुकीत आम्ही आणि मोहिते पाटील एकत्र नव्हतो, तरीही मारकडवाडीने मला १०४३ मतांचे लीड दिले होते. मग असं असताना मारकडवाडीत विरोधकांना मताधिक्य कसं मिळालं, असा सवाल होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 08 December : आमदारकीची शपथ घेण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. पण, माझ्या आमदारकीपेक्षा मारकडवाडीचा लढा महत्वाचा आहे. माझी आमदारकी लोकशाहीपुढं फार मोठी गोष्ट आहे, असं नाही. निवडणूक आयोग जर माळशिरस मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घेणार असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे, अशा शब्दांत माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आज (ता. 08 डिसेंबर) मारकडवाडीच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी आले होते. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विद्या चव्हाण, सचिन खरात हे उपस्थित होते. त्या सभेत बोलताना उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज दिले आहे.

उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, विधानसभा निवडणूक निकालानंतर माळशिरस तालुक्यातील जवळपास दहा ते पंधरा हजार लोक मला येऊन भेटले. आम्ही तुम्हाला मतदान दिलं; मग ते गेलं कुठं, असा त्यांचा आक्रोश होता. त्याला मार्ग काय आहे. मारकडवाडीतील लोक सलग तीन दिवस माझ्याकडे येत होते. आम्हाला आजूबाजूच्या गावांमध्ये तोंड दाखवयला जागा नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

मागील २०१९ च्या निवडणुकीत आम्ही आणि मोहिते पाटील एकत्र नव्हतो, तरीही मारकडवाडीने मला १०४३ मतांचे लीड दिले होते. मग असं असताना मारकडवाडीत (Markadwadi) विरोधकांना मताधिक्य कसं मिळालं, असा सवाल होता. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतंत्र मतदान घेण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी मतदान घेण्याची तयारी पूर्ण केली. ज्यांना निवडणुकीत मतदान केले, त्यांनाच मत देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांसंबंधीचे फलक सर्व गावात लावण्यात आले होते, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, मारकडवाडी गावाने निवडणूक घेण्याची सर्व तयारी केली. पण आदल्या दिवशी मला फोन आला की, मारकडवाडीतील मंडप काढून सर्व साहित्य घेऊन जावे, असे पोलिसांनी सांगितले आहे. मी रात्रभर गावात गावकऱ्यांसोबत चटईवर झोपलो. गावकऱ्यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांची जेवणाची सोयही केली होती.

सीआरपीएफच्या तीन तुकड्या आणि ८० पोलिस गावात आले होते. गावकऱ्यांना ‘मॉकपोल’ पाहिजे होते. मी मारकडवाडीची लढाऊ माती बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर गेलो आणि ती बाबासाहेबांच्या पायावर अर्पण केली. संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले. तेथून मी पाच मेणबत्या घेऊन आलो आहे. त्या माध्यमातून ‘ईव्हीएम’रूपी अंधकार आपल्याला दूर करायचा आहे, असे जानकर यांनी म्हटले आहे.

जानकर म्हणाले, माळशिरस तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले आहेत. मारकडवाडीने राम सातपुतेंना ५०० मतदान केले आहे. पण, मला १४०० लोकांना मतदान केले आहे. ते सर्व मला ऑफिडिव्हिट देणार आहेत. तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीचे ठराव आम्ही देणार आहे. आमची शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर मतदान घेणं सोपं आहे.

निवृत्त न्यायाधीशांची एक टीमही येणार

निवडणूक आयोग देशात एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घेऊ शकत नाही का. निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील येऊन गेले. निवृत्त न्यायाधीशांची एक टीमही येणार आहे.

मला १ लाख २१ हजार मताधिक्यांचे : जानकर

मला १ लाख २१ हजार मताधिक्य आहे. पण ईव्हीएममुळे माझे मतदान विरोधात गेले आहे. माझ्या धानोरे गावात लोकसभा निवडणुकीत दीडशे मते विरोधात गेली होती आणि माझ्याविरोधात तीनशे मतदान केले आहे. ते ऑफिडिव्हिट करून द्यायला तयार आहेत, त्यामुळे माळशिरसची पोटनिडणूक घ्यावी, अशी माझी विनंती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT