Markadwadi Voting : उत्तम जानकर हे प्यादं, मारकवाडी प्रकरणाचा मास्टर माईंड रणजितसिंह मोहिते पाटीलच;राम सातपुतेंचा हल्लाबोल

Malshiras Political News : ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांना मागे घ्यावे लागला.
Markadwadi Ballot Paper Voting
Markadwadi Ballot Paper VotingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 December : बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे मारकडवाडी ग्रामस्थांचे आंदोलन नव्हते. हे आंदोलन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी खोट्या नेरेटिव्हच्या माध्यमातून प्रशासनाला राज्य स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न होता. ईव्हीएमच्या नावाने बोंब मारायची, हा रणजितसिंह मोहिते पाटील यांचा डाव होता. तो डाव प्रशासनाने हाणून पाडला आहे. आमदार उत्तम जानकर हे प्यादं आहे. पण, या प्रकरणाचा मास्टर माईंड हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेच आहेत, अशा शब्दांत माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी मारकडवाडी मतदान प्रक्रियेवरून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांना मागे घ्यावे लागला. त्यावर बोलताना माजी आमदार राम सातपुते यांनी या प्रकाराला थेट आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना जबाबदार धरले आहे.

राम सातपुते (Ram Satpute) म्हणाले, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे गुंड गेली तीन दिवसांपासून मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांना धमक्या देत आहेत. मोहिते पाटील यांचे त्या परिसरातील पदाधिकारी मारकडवाडीत जाऊन मतदारांना धमकाविण्याचे प्रकार करत होते. आमदार उत्तम जानकर हे प्यादं आहे; पण या प्रकरणाचा मास्टर माईंड हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हेच आहेत.

Markadwadi Ballot Paper Voting
Markadwadi Ballot Paper Voting : मारकडवाडी बॅलेट मतदानाबाबत मोठी अपडेट; आमदार जानकरांनी घेतला 'हा' निर्णय

आमदार मोहिते पाटील यांनी अशा प्रकारे आम्हाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी माळशिरस तालुक्यातील एक लाख आठ हजार ५६६ मतदारांनी आम्हाला मतदान केलेले आहे. हे मारकडवाडीचा विषय म्हणतात. पण, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मारकवाडीत सिमेंटची एक पाटी टाकली नव्हती, असा आरोप राम सातपुते यांनी केला.

आम्ही आमदार असताना २१ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मारकडवाडीसाठी दिला होता. या गावात सात कोटी रुपये खर्चून आम्ही एक छोटसं पर्यटन केंद्रही तयार केले आहे. त्या गावातील रस्ते चांगले केले आहेत, सभामंडप उभारले आहेत.

Markadwadi Ballot Paper Voting
Solapur-Markadwadi : गोळ्या घातल्या तरी ‘बॅलेट’वर मतदान घेणारच; मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक, जमावबंदीचा आदेश, कार्यकर्त्यांना नोटिसा

या गावातील सुमारे ७०० पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहिण योजनेचा फायदा मिळवून दिला, त्यामुळे मारकडवाडीची जनता आमच्यासोबत उभी राहिली आहे आणि एक हजारपेक्षा जास्त मते आम्हाला पडली आहेत. मात्र, एक खोटा नेरिटिव्ह रणजितसिंह मोहिते पाटील हे तयार करत होते. मात्र, मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी त्याला भीक घातली नाही, असा टोलाही राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com