Asaduddin Owaisi-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Asaduddin Owaisi : सोलापूरच्या सभेत ओवेसीही अजितदादांवर बरसले; ‘अजित पवारकों तीन मिनिटमें गुंगा बनाकर वापस भेज दूंगा’

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादीला थेट आव्हान दिले, त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 09 January : महापालिका निवडणुकीच्या पुण्यात भाजप विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय कलगीतुरा राज्यात गाजत असतानाच एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही अजितदादांनाच टार्गेट केले आहे. राष्ट्रवादीने मुस्लिम समाजातील मातब्बर उमेदवार घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यावरून सोलापुरातील सभेत बोलताना ओवेसींनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत आहे, अजित पवार को तीन मिनिट में गुंगा बनकर वापस भेज दूंगा, असे चॅलेंज ओवेसींनी राष्ट्रवादीला दिले आहे.

एमआयएम () उमेदवारांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी यांची आज सोलापुरातील नई जिंदगी चौकात प्रचार सभा झाली. त्या सभेत ओवेसींनी अजितदारदांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) हे नई जिंदगी परिसराचा तिरस्कार करतात. पण हा परिसर असदुद्दीन ओवोसींना पसंत आहे. या लोकांनी नई जिंदगी परिसरास वेडंवाकडं म्हटलं तर मी त्यांच्या बापाला बोलेन, याचं त्यांनी भान ठेवावं.

कोणीतरी म्हणाले की, माझ्या शेरवानीला हात घालणार, देखो भाईसाहब, याद रखो छेडखानी नही करना. तुम्हारा राजकीय बाप अजित पवार जाके बोल की मेरे सामने आकर बैठ. तीन मिनिटमें गुंगा करके वापस भेज दूंगा. त्यामुळे छेडखानीच्या गोष्टी करायच्या नाहीत. संसदेत भाषण करायला लागल्यावर ज्यांना खाज होते, ते माझ्याकडून खाजवून घेतात. त्यामुळे अशा वल्गना करायच्या नाहीत, असा इशाराही असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी दिला

गुलामी करतोय, तर गुलामीच करना. काही खायला मिळालं तर गूपचूप खा ना. माझ्यावर बोलण्यामुळे तुला ते मिळतंय, हे तूझ्या लक्षात ठेव. तुझा बाप मी आहे, तू मला जास्त बोलला तर तुझे दुकान बंद करून टाकेन, असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक उमेदवाराला दिला.

ओवेसी यांनी म्हटले आहे की, अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत, त्यांना मत देणे म्हणजे मोदीला मत देण्यासारखे आहे. पवारांना मत म्हणजे वक्फ बोर्ड कायद्याला विरोध करणे आहे. मशिदी हिसकावून घेण्याच्या कार्यक्रमात मोदींना मदत करण्यासारखे आहे. अजित पवारांना मशिद, दर्ग्याशी काहीही देणे घेणे नाही. पण, आमची ती ओळख आहे, त्यामुळे मत देताना विचार करूनच द्या.

मोदी, शिंदे आणि अजित पवार हे त्रिमूर्ती आहेत, ते एकच आहेत. त्यांच्यात कोणताही फरक नाही. तुमच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, त्यामुळे पंधरा तारखेला पतंगालाच मतदान करा, असे आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

आताच मला कळलं की, प्रभाग क्रमांक २२ मधील राष्ट्रवादीचा एक उमेदवार आहे. त्याने आपल्या बापाचं नाव घ्यावं ना. माझं नाव का घेतोस. मला एक मत द्या आणि तीन पतंगाला द्या, असा प्रचार तो करतोय. अरे तुझा राजकीय बाप कोण आहे, हे आधी सांग. पतंगलाच मत द्या; जोकरला मत देऊ नका. अजित पवारांचं नाव घेतलं तर टाटा, बाय बाय होणार आहे. हे त्याला माहिती असल्यामुळे तो एक मत मागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT