

Solapur, 09 January : महापालिका निवडणुकीच्या प्रचारामुळे सोलापूरचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता प्रशासनात वाद पेटला आहे. श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बोलावलेल्या बैठकीला महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी दांडी मारली, त्यामुळे संतापलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रा नियोजनाची बैठक रद्द करून मनपा प्रशासनाची थेट मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. निवडणुकीमुळे राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतानाच आता प्रशासनही समारोसमोर आले आहे.
दरम्यान, जिल्हा आणि महापालिका प्रशासनातील वाद पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत गेला असून त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्याची माहिती आहे. आता या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद पालकमंत्री गोरे कसे मिटविणार, याकडेही सोलापूरचे (Solapur) लक्ष असणार आहे.
जिल्हा प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे हा गोंधळ झाल्याचे मनपा आयुक्त (Municipal Commissioner) कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीतच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा आणि मनपा प्रशासनात वाद सुरू झाला आहे, त्यामुळे अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या यात्रेच्या नियोजनाचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
सिद्धरामेश्वरांच्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या काळात जिल्हा, मनपा आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध कामांचे नियोजन, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एकत्रित बैठक घेतली जाते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने तीनच्या सुमारास बैठकीचे आयोजन केले होते.
साडेतीन वाजले तरी महापालिकेचा एकही अधिकारी बैठकीकडे फिरकला नव्हता. पालिकेचे सर्व अधिकारी हे निवडणुकीच्या नियेाजनाच्या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे ते आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक रद्द करून टाकली.
संतापलेले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी महापालिका प्रशासनाची तक्रार थेट राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाचे अतिरिक्त सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालकांकडे केली आहे. महापालिकेचे अधिकारी निष्काळजी आहेत, त्यांची गैरहजेरी चुकीची आहे, असेही अहवालात म्हटले आहे, त्यामुळे महापालिका निवडणुका आणि सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या तोंडावर अधिकाऱ्यांमधील इगो उफाळून आल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.