Dhananjay Mahadik -Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP-NCP Politics : शरद पवार आमच्यासोबत आले तर...; धनंजय महाडिकांनी व्यक्त केली इच्छा

Maharashtra Politics : शिंदे गटाचे 13 खासदार भाजपसोबत आहेत. आता सीटिंग जे खासदार आहेत त्या जागा त्यांनाच मिळतील.

अनुराधा धावडे

राहुल गडकर

Kohapur Politics : एकेकाळचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे भाजपमध्ये गेल्यानंतर अजूनही त्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे. त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेतून ते दिसून येते. नुकतेच त्यांना त्याबाबत विचारले असता, त्यांनी शरद पवार आमच्यासोबत आले तर मला आनंद होईल. पण अशी अधिकृत माहिती माझ्यापर्यंत नाही, असे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारसाहेब नरमलेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण शरद पवारांचा राजकीय प्रवास, त्यांचा अभ्यास, त्यांची ऊर्जा ही अनमॅच आहे. सध्या त्यांचे राज्यभर आणि देशभर दौरेसुद्धा सुरू आहेत. आता राजकीय वरिष्ठांसोबत त्यांची काय चर्चा झाली, हे आपल्याला माहिती नाही. पण अजित पवार हे विकासासाठी भाजपसोबत आलेले आहेत. पंतप्रधान मोदींचे विचार जोपासण्यासाठी ते आमच्यासोबत आलेले आहेत. त्याच पद्धतीने जर पवारसाहेब आमच्यासोबत येत असतील तर आनंदच आहे, असे महाडिक म्हणाले.

शिंदे गटाचे 13 खासदार भाजपसोबत आहेत. आता सीटिंग जे खासदार आहेत, त्या जागा त्यांनाच मिळतील. हे आत्तापर्यंत ठरले आहे. मात्र, पुढे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल त्यावर अवलंबून आहे. शिंदे गट, अजित पवार यांचा गट दोन्ही पक्ष आमच्यासोबत आहेत. त्यामुळे मोठ्या ताकदीने आम्ही सामोरे जाणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT