Kolhapur Politics : संजय मंडलिक गप्प का? राष्ट्रवादीचा थेट सवाल

Shetkari Sangha Politics : शेतकरी संघ अडचणीत आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकाने मंडलिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
Sanjay Mandlik
Sanjay Mandlik Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी शेतकरी संघ व सभासदांच्या हितासाठीच भवानी मंडप येथील जागा खरेदी केली होती. त्यावेळी त्यांची शेतकरी संघ उभारण्याची धडपड होती. पण आता हीच जागा ताब्यात घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. याबाबत खासदार संजय मंडलिक गप्प का? असा सवाल शेतकरी संघाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने केला आहे. खासदार मंडलिक यांनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Sanjay Mandlik
Sharad Pawar in Killari : भूकंपानंतर मदतीचा हात देणाऱ्या शरद पवारांबद्दल किल्लारीकर व्यक्त करणार कृतज्ञता...

शेतकरी संघ अडचणीत आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकाने मंडलिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी त्यांनी अवघ्या 3.50 लाख रुपयांना ही जागा घेतली. त्यावेळी त्यांच्यावर शेतकऱ्यांचा पैसा चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याची काही लोकांनी टीकाही केली. त्याच टीकाकारांना आपली चूक लक्षात आली आणि मोक्याची जागा खरेदी केल्याबद्दल मंडलिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. हीच जागा आज पालकमंत्री व जिल्हाधिकारी जागा ताब्यात घेत आहेत. यासाठीच खासदार मंडलिक यांनी वडिलांनी घेतलेली जागा वाचविण्यासाठी काय करणार ? त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे थेट आव्हानही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी रेखावार वादग्रस्त?

बाबा इंदूलकर म्हणाले, या संघात यापूर्वी पदे भोगली. चेअरमन झाले, संचालक झाले. त्यापैकी किती लोक उपस्थित राहिले ? अशी खंत व्यक्त केली. जिल्हाधिकारी रेखावार हे मराठा द्वेष्ठे आहेत. त्यांनी हे आदेश काढले आहेत. त्यांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक ठिकाणी त्यांची लोकांच्या मागणीवरूनच दुसरीकडे बदली झाली असल्याचे सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Sanjay Mandlik
Vaidyanath Sugar Factory : मुंडेंच्या कारखान्यातून निघायचा सोन्याचा धूर; आता 'वैद्यनाथ'चे धुराडे का कोलमडले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com