Bachhu Kadu : निवडणुकांचा निकाल लागायला दोन दिवस उशीर झाला तरी चालेल, मात्र निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
राजकीय कार्यकर्त्यांवर आंदोलनामुळे गुन्हे दाखल करून तडीपारीच्या नोटीस काढणार असाल तर, सर्वात आधी मला तडीपार कराव लागेल,कारण माझ्यावर 450 गुन्हे दाखल आहेत, असेही मिश्किलपणे कडू म्हणाले. प्रहारचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले होते.
आजच्या शिक्षक पदवीधर निवडणूक निकालावर बच्चू कडू म्हणाले, "शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी केवळ दोन लाख मतदार आहेत. त्यामुळे आलेल्या निकालावरून सत्ताधारी पक्षाचे जनमत कमी झाले, असे म्हणता येणार नाही"
सरकारकडूनदिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले आहे, त्यामुळे मला फार अपेक्षा नाहीत. दिव्यांग मंत्रालयावर कोणीही मंत्री येऊ दे, काही हरकत नाही. मात्र मला मंत्रालय मिळाले तर आणखी जोमाने काम करेन. लाल दिव्याची गाडी मिळाली नसली तरी आमच्याकडे टू व्हीलर उपलब्ध आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.