Manoj Jarange Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : निवडणुकीत उतरलो असतो तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil Pandharpur Tour : मराठा समाजाला मी कोणाच्याही दावणीला बांधलेलं नाही आणि बांधणारही नाही. समाज त्यांच्या मताचा मालक आहे, विधानसभा निवडणुकीत त्यांना जे वाटलं, ते त्यांनी केलं. समाजावर मी मनमानी केलेली नाही.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 02 December : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मी आणि मराठा समाज नव्हता. आमचं एमएमडी समीकरण जुळलं असतं तर सगळ्यांचा सुपडा साफ केला असता, अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी रविवारी (ता. 01 डिसेंबर) रात्री उशीरा विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, गोरगरिबांना शक्ती मिळावी, अशी प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी केल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मराठा समाजाला मी कोणाच्याही दावणीला बांधलेलं नाही आणि बांधणारही नाही. समाज त्यांच्या मताचा मालक आहे, विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) त्यांना जे वाटलं, ते त्यांनी केलं. समाजावर कसलीही मनमानी मी केलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हता.

नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलविण्यात येणार आहे. त्या बैठकीत आंदोलनाची आगामी दिशा निश्चित करण्यात येईल. मराठा समाजाला मी ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार आहे, त्यासाठी अंतरवाली सराटीत घराघरांत उपोषण केले जाईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मुंबईत जाऊन उपोषण करावे, अशी समाजातील अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार उपोषण केले जाईल. पण, राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर आंदोनाबाबतची दिशा ठरविण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ३० ते ३२ आमदारांनी आपली भेट घेतली आहे. सरकार स्थापन झाल्यावरही अनेक आमदार आपली भेट घेतील, असेही जरांगे यांनी नमूद केले.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली तर त्यांचे स्वागत करणार का, असा प्रश्न विचारला असता ‘आपण जर तर च्या प्रश्नानांना उत्तरे देत नाही. पण त्यांच्या आधी तुम्हालाच घाई झाली आहे का? असा सवाल जरांगे यांनी केला. छगन भुजबळांच्या विरोधातही आपण भूमिका घेतली होती, या प्रश्नावरही त्यांनी थातूरमातूर उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT