Deputy Sarpanch Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Deputy Sarpanch Election : सरपंचांना भाव अन्‌ उपसरपंचांकडे पाठ....

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : : मंगळवेढा तालुक्यात २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीनंतर अनेक पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे केले, त्यासाठी पक्ष आणि स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ दिसली. मात्र, उपसरपंच निवडीनंतर ती दिसली नाही. बहुतांश नेत्यांनी उपसरपंच निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. (Ignorance of the political leaders and the party towards the election of Deputy Sarpanch)

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका मंगळवेढा तालुक्यात झाल्या. थेट जनतेतून सरपंच निवड असल्यामुळे अनेकांनी सरपंच होण्याकडे लक्ष केंद्रित केले होते. तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी ब्रह्मपुरी आणि हिवरगाव या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवेढ्यातील 25 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. निकालानंतर समर्थकांनी गुलाला उधळून आनंदोत्सव साजरा केला. काही सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी राजकीय नेत्यांच्या कार्यालयाला भेटी देत सत्कार स्वीकारला. त्यामुळे संबंधित नेत्याने ही गाव आमच्याकडे आहे, असा दावा करण्यात येऊ लागला. तालुक्यात 27 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या, पण दावे ७० पेक्षा जास्त करण्यात आले. या 27 ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक दुष्काळी पट्ट्यातील होत्या. मात्र, निवडणुकीत लाखो रुपयांचा चुराडा झाला.

निवडणुकीत ज्यांचं पॅनेल पडलं आणि जे पराभूत झाले, त्यांनी मतदारांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यात काही गावांत रस्ते अडवण्याचे प्रकारही झाले. नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली, त्यामध्ये 27 पैकी 23 ग्रामपंचायतीचे उपसरपंच बिनविरोध झाले. नंदुर, लक्ष्मी दहिवडी, शेलेवाडी, रड्डे या चार ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीसाठी मतदान झाले. त्यामध्ये नंदुर येथे सरपंचांनी निर्णायक मत देत उपसरपंच निवडला. या ठिकाणी सरपंच, उपसरपंच एकाच गटाचे झाले.

उपसरपंचांच्या निवडीनंतर त्यांचा सत्कार व दावे करण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. ग्रामपंचायतीच्या राजकारणात सरपंचाइतकेच उपसरपंचाला महत्त्व आहे. मात्र, उपसरपंचांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT