Konkan News : राणे-केसरकर 12 वर्षांनंतर भेटले; भेटीनंतर म्हणाले ‘आमच्यात वैयक्तिक संघर्ष कधीच नव्हता...’

Deepak Kesarkar meet Narayan Rane : दोघांमधील टोकाचा संघर्ष उभ्या कोकणाने पाहिला आहे.
Deepak Kesarkar-Narayan Rane
Deepak Kesarkar-Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Kankavali News : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज (ता. 27 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल 12 वर्षांनंतर हे दोन नेते एकमेकांना भेटले. भेटीनंतर केसरकर आणि राणे यांनी ‘आमचा कधीही वैयक्तिक संघर्ष नव्हता’ असे सांगितले. मात्र, हे दोन राजकीय नेते भेटल्याने त्यांच्यात राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Narayan Rane and Deepak Kesarkar meet after 12 years)

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर केसरकर आणि राणे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण कोकणाला माहिती आहे. या दोन्ही बाजूंकडून आरेला कारे असे म्हटले गेले आहे. दोघांमधील टोकाचा संघर्ष उभ्या कोकणाने पाहिला आहे. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर कोकणातील या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Deepak Kesarkar-Narayan Rane
Dispute In BJP : ‘आमच्या घरात येऊन अमित शाहांनी माझा घात केला’; भाजपच्या माजी मंत्र्याची खदखद बाहेर...

नारायण राणे यांच्यासोबतची भेट ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनेच असते. जिल्ह्याच्या विकासासाठी ते कायम मार्गदर्शन करत असतात. आम्ही लवकरच पुन्हा एकत्र बसणार आहोत. त्यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी नवीन काय करता येईल, याबाबतची चर्चा होईल, असेही दीपक केसरकर यांनी भेटीबाबत स्पष्ट केले.

शालेय शिक्षणमंत्री म्हणाले की, काही डीएडधारक बेरोजगार तरुण हे केंद्रीय मंत्री राणे यांना भेटायला आले होते, त्यामुळे त्यांनी मला फोन करून बोलावून घेतले. म्हणून मी मुद्दाम राणेंना भेटायला आलो होतो. तुमच्या मनात जे आहे, तसं काही नाही. जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात आम्ही दोघं एकत्र काम करणार, असे यापूर्वीच जाहीर केले होते. नारायण राणे यांच्याविषयी पूर्वी जो आदर होता, तो आजही कायम आहे. त्यामुळे काही गैरसमज निर्माण होऊ नये. राणे यांच्या मुंबईतील घरीही मी गणेशोत्सवावेळी गेलो होतो.

Deepak Kesarkar-Narayan Rane
Bidri Sugar Factory Election : ‘बिद्री’च्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम; मुश्रीफ-घाटगे, महाडिक-पाटील आमने सामने

आमच्यामध्ये कधीही मतभेद नव्हते आणि नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएडधारक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यांना नोकरी मिळावी, एवढाच माझा उद्देश आहे. म्हणून दीपक केसरकर यांना मी बोलावले होते. रत्नागिरीत जो निर्णय झाला, तसा सिंधुदुर्गमध्येही व्हावा आणि विद्यार्थ्यांना कायम नोकरी मिळावी. आमच्यात राजकीय संघर्ष होता, वैयक्तिक संघर्ष कधीही झाला नाही, असे राणे यांनीही सांगितले.

Deepak Kesarkar-Narayan Rane
Nagar Politics : राठोडांची विखेंवर जहरी टीका; 'नगर दक्षिणचं दिवाळं काढणाऱ्यांना जनता लोकसभेला चोख हिशेब देईल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com