Chandrashekhar Bawankule In Satara Sabha Pramod Ingale, Satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara BJP News : २०२४ ला तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होणार; साताऱ्याचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणार : चंद्रशेखर बावनकुळे

Umesh Bambare-Patil

Satara BJP News : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार भाजपचाच होणार असून, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी घर चलो अभियानांतर्गत आज सातारा शहरातील बाजारपेठेत पदयात्रा काढून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. तसेच २०२४ ला कोण पंतप्रधान होणार, तुमचा आवडता पंतप्रधान कोण असे प्रश्न विचारले. त्यावर सर्वांनीच मोदी मोदी मोदी..Narendra Modi अशी उत्तरे दिली. त्यानंतर सराफ व्यावसायिक चंद्रशेखर घोडके यांच्या घरासमोर सभा झाली.

या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, सुनील काटकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले, विक्रम पावसकर, रंजना रावत, वैशाली राजेमहाडिक, गीतांजली कदम, चंद्रशेखर घोडके, स्मिता घोडके, विकास गोसावी, धनंजय जांभळे यांच्यासह दोन्ही राजांचे माजी नगरसेवक व व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, मोदींनी निर्माण केलेल्या गरीब कल्याणाच्या योजना घेऊन आम्ही जनतेत जात आहोत. जगातील १५० च्या वर देशांनी सर्वोकृष्ट पंतप्रधान म्हणून मोदींना मान्यता दिली आहे. जगातील ७८ टक्के लोकांनी मोदीजींना पसंती दिली आहे. १४ देशांचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मोदीजींना मिळाला आहे.

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. त्या मोदींना हारविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत, पण साताऱ्याच्या जनतेने निर्णय घेतला आहे. कितीही एक व्हा, २०२४ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यावेळी साताऱ्याचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदींचे समर्थन करेल.

मोदीजींनी महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन संसदेत १९१ महिला खासदार पाहायला मिळतील. देशाच्या १४० कोटींच्या भवितव्यासाठी या महिला खासदार काम करतील. महाराष्ट्राच्या विधानसभेत गोरे व माझे काय होईल हे माहिती नाही, पण शंभर महिला आमदार असतील.

काँग्रेस पक्ष तर जनतेत भाजपविषयी संभ्रम निर्माण करत आहेत. डॉ. बाबासाहेबांची घटना बदलणार, मुस्लिम समाजाला देशातून बाहेर काढणार असे पोपटासारखे काहीही सांगत आहे. मुळात काँग्रेस पक्ष म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. हा पक्ष म्हणजे देशाला लागलेला कॅन्सर आहे. या सर्वांना धडा शिकवण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सातारचा खासदार निवडून द्या. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी शिवेंद्रसिंहराजेंना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT